प्रतिनिधी प्रविण चव्हाण
नंदुरबार -: नवापुर पोलीसांची अवघ्या काहीही तासातच मोबाईल दुकान चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन संशयित आरोपीतासह चोरीचा 71 हजार 726 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला .
या बाबत सविस्तर माहिती अशी की , दि . 5 सप्टेंबर रोजी मोहीन रहेमान शेख रा . मुसलमान मोहल्ला , नवापुर यांनी नवापुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की , नवापुर शहरातील बस स्टॅन्ड समोरील आमिन नावाचे मोबाईल व मोबाईल एसेसरीजचे आमिन नावाचे मोबाईलचे दुकानात 4 सप्टेंबर रोजी दुकानात आत प्रवेश केला असता त्यांना त्यांचे मोबाईलचे दुकानातील सामान अस्ता व्यस्त दिसल्याने तसेच त्यांचे दुकानाचे मागील बाजुस असलेली लोंखडी खिडकीची ग्रील ही तोडलेली दिसल्याने त्यांना खात्री झाली की , त्यांच्या मोबाईलच्या दुकानातुन रात्रीच्यावेळी कोणीतरी अज्ञात चोरटांने मोबाईल दुकानाचे मागील बाजुस असलेली लोंखडी ग्रील तोडुन दुकानात आत प्रवेश करुन दुकानात ठेवलेले नवीन मोबाईल , मोबाईल एसेसरीजचे सामान , स्मार्ट वाँच ( घड्याळ ) तसेच ड्रावरमध्ये ठेवलेले 6 हजार रोख असे एकुण 79 हजार 654 रुपये किंमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने नवापुर पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली असता , नवापुर पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार दादाभाई वाघ यांच्याकडे दिला होता .
पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार पोलीस उपअधिक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली , सहा . पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी गुन्ह्याचे चक्र जलद गतीने फिरवुन अधिकची माहीती काढुन गुन्ह्याचा छडा लावत मिळालेल्या गोपनिय माहीती नुसार गोकुळनगर , खेकडा ता . नवापुर येथील राहणारा रंजित निलेश मावची याने सदर मोबाईलच्या दुकानातील मुद्देमाल चोरी करुन घेवुन गेला आहे . बाबत माहीती मिळाल्याने , संशयित आरोपीतास खेकडा ता.नवापुर येथे तपास पथक लागलीच रवाना करुन संशयित आरोपीतास ताब्यात घेटले . त्यास गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मुद्देमाला बाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल हा त्याच्या राहत्या घराच्या बाजुस असलेल्या गायींचा गोठ्याचे वरील छतावर लपवुन ठेवलेला गुन्ह्यातील चोरीस गेलेला 71 हजार 726 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
सदर ची कारवाई सहा .
पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नवापुर पोलीस स्टेशनचे पथक पोसई अशोक मोकळ , असई गुमानसिंग पाडवी , पोहेकाँ दादाभाई वाघ , पोना नितीन नाईक , नामदेव राठोड , संदिप सोनवणे यांनी केला असून,
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार दादाभाई वाघ हे करीत आहेत .
Users Today : 11