प्रतिनिधी अशोक भाकरे
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान कार्य सम्राट आमदार चंद्रकांत पाटील यांनी 2017 पासून मांगलवाडी,तांदलवाडी , बलवाडी सुलवाडी कोळदा ऐनपुर पिंप्री नांदू व इतर 14 गावांचे प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी गावकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन चर्चा करून सदर प्रश्न सोडवण्यासाठी आपली मुख्यमंत्र्यांसोबत लवकर चर्चा करून आपला प्रश्न सोडण्यात येईल असे आश्वासित केले होते. व सुलवाडी ते मेढोळदा या गावाला जोडणारा तापी नदी वर पुल बांधण्यात यावे म्हणून विधानसभेत मागणी केली त्यानुसार लवकरच कामाला सुरुवात होईल.तसेच तसेच मा.मंत्री डॉ. दशरथ भांडे यांच्या नेतृत्वाखाली कोळी समाजाचे अधिसंख्य पदाचा व इतर महत्त्वाचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन माननीय कार्यसम्राट आमदार चंद्रकांत पाटील यांनी समस्त कोळी समाज बांधव तसेच मा.भांडे साहेब यांना दिले होते त्यानुसार त्यांनी अतिसंख्य पद हे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सोडवून कोळी समाजाला मोठा दिलासा दिला आहे. तसेच आगामी काळात कोळी समाजाचा जात प्रमाणपत्राचा प्रश्न सोडविण्यासाठी मी व सरकार कटीबद्ध आहे जोपर्यंत समाजाला या प्रश्न सुटत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही एक दिवसीय धरला आंदोलनात आ. चंद्रकांत पाटील यांनी दिली तसेच त्या संदर्भात दि. २५/१२/२२ ला मुख्यमंत्री सौ. यांच्या सोबत बैठक आयोजित केली आहे. त्याचे वचनपुर्ती म्हणून पुनर्वसना संदर्भात आ.चंद्रकांत पाटील यांनी गावकऱ्यांच्या वतीने सदर मागणी संदर्भात मा. मुख्यमंत्री साहेब यांच्या सोबत शिष्टमंडळाच्या बैठक आयोजित करुन प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे मा. मुख्यमंत्री साहेबांनी कार्यसम्राट आ. चंद्रकांत भाऊ पाटील व गावकऱ्यांना दिले.त्यावेळी मांगलवाडी येथील सरपंच,उपसरपंच व ग्रा. प. सदस्य उमेश कोळी आणि ग्रामस्थ सुरेश तायडे,बाळु चौधरी,सुहास कुलकर्णी,शातांराम कांडेले,रविंद्र तायडे,जितेंद्र कोळी आदिवासी कोळी महासंघाचे रावेर तालुका अध्यक्ष मनोहर कोळी उपस्थित होते.व सर्वानी गावकऱ्यांच्या वतीने मा. मुख्यमंत्री साहेब व मा. आ. चंद्रकांतभाऊ पाटील यांचे आभार व्यक्त केले.त्यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले तसेच संपूर्ण महाराष्ट्रात कोळी समाजात सुध्दा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे संपूर्ण गावकऱ्यांच्या व कोळी समाजाच्या वतीने आ.चंद्रकांत पाटील यांचे आभार व्यक्त केले जात आहे.