थाळी

Khozmaster
1 Min Read
थाळी ..
गुरू द्वारात   लंगर
भक्त जेवी पोटभर
विचारू नका कसे
अन्न पुरते  गावभर
अन्न  छत्रे  मंदिरात
प्रसाद वाटे चवदार
स्व खुशीने  देणग्या
भक्त होती दिलदार
कुराणात अन्नदानां
महत्व  ते अपरंपार
अन्नदान  श्रेष्ठ भारी
पुण्यसंकलन अपार
सर्वधर्मा सांगितला
मानवता   सदाचार 
घासातला द्या घास
समान  हा सुविचार 
इच्छेची  एक घागर
बनतो मोठा  सागर
भक्ती बनता  शक्ती
भुकेले जेवे पोटभर   
अन्ननासाडी टळता
अन्न पुरेलं खरोखर
उपाशी तो झोपूनये
सुखी  सारी धरोवर
– हेमंत मुसरीफ पुणे 
  9730306996.
0 9 4 8 7 9
Users Today : 51
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *