सोयगाव येथे रब्बी पिक कापणी प्रयोग प्रशिक्षण संप्पन्न

KHOZ MASTER
2 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव येथे रब्बी पिक कापणी प्रयोग प्राशिक्षण संपन्न दि 25-12-2022 रोजी बचत भवन, पंचायत समिती सोयगाव येथे तहसीलदार रमेश जसवंत, गट विकास अधिकारी प्रकाश नाईक, तालुका कृषि अधिकारी एस जी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली रब्बी पिक कापणी प्रयोग प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार जी के सुरे यांनी पिक कापणी प्रयोगाचे महत्व व आवश्यकता याविषयी माहिती दिली.तालुका कृषि अधिकारी एस जी वाघ यांनी सोयगाव तालुक्यात रब्बी हंगामा साठी गहु व हरभरा पिकासाठी पिक विमा योजना लागू असून त्यासाठी पिक कापणी प्रयोग आवश्यक आहे. पिक कापणी प्रयोगाच्या उत्पादकतेवर पिक विमा मंजूर होतो असे सांगितले व ज्या विमा धारक शेतकऱ्याचे वैयक्तिक नुकसान झाले असल्यास त्यांनी 72 तासाच्या आत नुकसानीची तक्रार ऑनलाईन करावी असे सांगितले. एम पी सैदाणे कृषि अधिकारी सोयगाव यांनी पिक कापणी प्रयोगाचे सविस्तर प्रशिक्षण दिले यात पिकाचा प्लॉट निवड करणे, रँडम काढणे व पिक कापणी प्रयोग तक्ते अचूक भरणे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मंडळ कृषि अधिकारी आर जि गुंडीले यांनी पिक विमा योजना विषयी माहिती दिली तसेच कृषि पर्यवेक्षक हेमंत देशमुख यांनी तालुक्यातील रब्बी पिक कापणी प्रयोगाचे नियोजन व पिक कापणी प्रयोग करताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.पिक विमा तालुका प्रतिनिधी गजानन जाधव यांनी पिक कापणी प्रयोग प्लॉट ची आखणी व मोजमाप याविषयी माहिती दिली.यावेळी सदरील प्रशिक्षणास तालुक्यातील कृषि सहाय्यक, ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *