देवेंद्र सिरसाट नागपूर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुत्ववादी आहेत. ते नेहमी नवस फेडायला दिल्लीत जातात. सीमावादाच्या मुद्द्यावर ते नवस केव्हा फेडणार असा रोखठोक सवाल शिवसेना पक्षप्रमुख विधान परिषद सदस्य उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. कानडी लोकांकडून मराठी भाषिक लोकांवर अत्याचार सुरू आहेत. त्याविरोधात सरकार बोलायला तयार नाहीत. अशा सरकारचा आम्ही निषेध करतो. जोपर्यंत सीमावादाचा प्रश्न निकाली लागत नाही, तोपर्यंत हा सीमाभाग केंद्रशासित करावा, अशी मागणी आपण करत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
आमच्याकडे बरेच बॉम्ब उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात सत्तेत टिकून राहावे यासाठी एकनाथ शिंदेंनी नवस केला आहे. हा नवस फेडण्यासाठी ते सतत दिल्लीच्या वाऱ्या करत असतात, अशी टीका त्यांनी केली. आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत. वातीही बाहेर काढून ठेवल्या आहेत. आता फक्त पेटवायचा अवकाश आहे, असा इशारा देत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रा-कर्नाटक सीमाप्रश्नावरून मिंधे सरकारवर हल्लाबोल केला.हिवाळी अधिवेशनात मराठवाडा विदर्भाच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी होती. मात्र सत्ताधाऱ्यांनीच गोंधळ घातल्यामुळे अधिवेशनाचे तीन दिवस वाया गेले. याचा जाब सत्ताधाऱ्यांनाच विचारावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमन्यम स्वामी यांनी राज्यातील सरकार असंवैधानिक आहे, असे म्हटले आहे. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले स्वामींनी त्यांना घरचा अहेर दिला आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी दिली.
शेतकरी हैराण सत्तार खातो गायराण, गायराण जमिन प्रकरणात विरोधक आक्रमक
नागपूर मौजे घोडबाभूल जिल्हा वाशिम येथील सरकारी गायराण जमिन १५० कोटीची आहे. गायराण जमिनी कुणाला देता येत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निणर्य आहे. ही माहिती सरकारला असतानाही ३७ एकर गायराण जमिन योगेश खंडारे या व्यक्तीला वाटप करण्याचा निणर्य घेतला आहे. या प्रकरणात नागपूर खंडपीठाने आपले गंभीर निरिक्षण नोंदिले आहे. तत्कालीन अब्दूल सत्तार यांच्या प्रकरणी पुरावे आहे. यासंदर्भात अजित पवार यांनी विधानसभेत आरोप केला. यावेली तत्काळ मंत्रिमंडळातून सत्तार यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली. या मुद्यावर गोंधळ घालत, विरोधी पक्षांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर सत्तार आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केल्या.