आंदोलन दडपण्यास व चोरीन कोळशाचे ट्रक काढण्यास शेतक-यांना पोलीसांनी रात्री पकडुन नगरपरिषदेत कोंबुन ठेवले.
देवेंद्र सिरसाट नागपूर.
कन्हान महामिनरल मायनिंग व बेनिफेकिशन लि. (गुप्ता़) कोल वॉशरीच्या प्रदुषणाने त्रस्त वराड़ा, वाघोली, एसंबा घाटरोहणा व गोंडेगावच्या शेतक-याचे आंदोलन दडपण्यास व चोरीने कोळसा ट्रक काढण्यास शेतक-यांना उपविभागीय पोलीस अधिकारी बागवान यानी मध्यरात्री पकडुन कन्हान पोलीस स्टेशन ला नेऊन नविन नगरपरिषदेत कोंबुन ठेवल्याने संप्तत सरपंच विद्याताई चिखले सह परिसरातील सरपंच, ग्रा पं सदस्य, राजकीय मंडळी व शेतक-यांनी दिवसभर कन्हान पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन करून एक तर शेतक-यांवर किंवा कम्पनी वर गुन्हा दाखल करून कोल वासरी बंद करण्याची मागणी केल्याने १७ तासा नंतर कन्हान ठाणेदार विलास काळे यांनी ६८ ची कार्यवाई करून सायंकाळी आंदोलनकारी शेतक-यांना वराडा गावात नेऊन सोडून देण्यात आले.
पारशिवनी तालुक्यातील गोंडेगाव कोळसा खुली खदान लगत वराडा व मौजा एसंबा येथे महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळा द्वारे महामिनरल मायनिंग व बेनिफेकिशन लि. कोलवाशरी चा प्लांट मार्च २०२१ ला सुरू करण्यात आला. या कोल वॉशरी मध्ये गोंडेगाव कोळसा खुली खदान व इतर खदान येथुन येणा-या कोळशाला वॉश करण्यात येत असल्याने उडणा-या कोळसा धुळी मुळे वायु आणि जल प्रदुषणाने वराडा, वाघोली, एंसबा, घाटरोहणा व गोंडेगाव येथील ६०० एकरावर शेती पिक प्रदुषित होत नुकसान होत आहे. कोळसा धुर मिश्रीत पाण्यामुळे जमिनीचे पाणी ही प्रदुषित झाले आहे. धुळकणामुळे गावक-यांचे आरोग्य सुध्दा धोक्यात आल्याने शेतक-यांनी कोळसा धुळीचे प्रदुषण बंद करण्यास वारंवार संबधित अधिका-यांना तक्रार देवून आंदोलन केले. तरी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ अधिकारी वॉसरी कंम्पनीला मदत करित असल्याचे दिसत आहे. आज उद्या बैठक लावुन विषय मार्गी लावु असे सातत्याने आश्वासन दिले जात होते. कोल वॉसरी च्या धुळीने त्रस्त झालेले शेतकरी व जय जवान जय किसान संघटनेने कोल वॉशरी समोर शुक्रवार (दि.२३) डिसेंबर २०२२ ला ही कोल वॉशरी बंद करण्यासाठी आंदोलन केले. तेव्हा जय जवान जय किसान संघटने चे प्रशांत पवार आणि माजी मंत्री मा. सुनिल केदार यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी अशोक करे मंडळाचे सचिव प्रविण दराडे यांच्या सोबत फोन वर चर्चा करून बेकायदेशीर सुरू असलेली ही कोल वॉशरी ताबडतोब बंद करून शेतक-याना न्याय द्यावा अन्यथा बेमुदत आंदोलन करू असे सांगण्यात आले. तेव्हा, काही वेळ कंपनी बंद ठेऊन शनिवार (दि.२४) ला कंपनीतुन कोळशाचा ट्रक भरून काढु लागल्याने शेतक-यांना पुन्हा आंदोलन केल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांनी पोलीसांव्दारे टप्या टप्याने मध्यरात्री १ वाजता आंदोलनकारी शेतक -यांना पकडुन कन्हान पोलीस स्टेशनला नेऊन शेतक-यांना नविन नगरपरिषदेत कोंबुन ठेवले.
रविवार (दि.२५) सकाळी संतप्त, सरपंच विद्या चिखले सह चार महिला पोस्टे कन्हान ला गेले असता त्यांनाही ताब्यात घेतल्याने जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, कांग्रेस नेते चंद्रपाल चौकसे, माजी जि प अध्यक्ष रश्मिताई बर्वे, पारशिवनी पं स सभापती मंगला निंबोने, पं स सदस्य निकीता भारव्दाज, रिता बर्वे, उपसभापती करूणा भोवते, नरेश बर्वे, राजेश ठाकरे, दयाराम भोयर, सिताराम भारव्दाज, देविदास जामदार, देवाजी शेळकी, बबलु बर्वे, आत्माराम उकुंडे, प्रेम रोडेकर, योगेश वाडीभस्मे, उत्तम सुळके, किशोर बेहुणे, अशोक पाटील, नरेश ढोणे, मारोती नागमोते सह बखारी, साट क, डुमरी, गोंडेगांव, जुनी कामठी, यसंबा, निलज, नांदगांव चे सरपंच सह बहु संख्येने छोटे मुले, महिला, पुरुष शेतक-यांनी सकाळी पासुन पोलीस स्टेशन चा घेराव करून, शेतक-यांना पकडुन आणुन रात्री पासुन आंतकवाद्यांसारखे नविन नगर परिषद मध्ये कुलुप लावुन कोंबुन ठेवले असा प्रश्न उपस्थित करत, ते कुणा च्या तक्रारीने कुठल्या कायद्याने हे लेखी स्वरूपात देण्यात यावे. यावेळी स्थानिय जनप्रतिनिधी व राजकीय मंडळीने येऊन शेतक-यांच्या पाठीशी उभे राहिल्याने १७ तासानंतर उशीरा सायंकाळी ६ वाजता आंदोलक शेतक-यांना पोलीस वाहनाने वराडा येथे नेऊन सोडण्यात आले.रामटेक क्षेत्राचे आमदार, खासदार ह्यांनी हजेरी लावली नाही. पोलीस प्रशानाने कंम्पनी ला कडक पोलीस बंदोबस्त लावुन शेतक-यांचे आंदोलन दडपण्यास सहकार्य करित शेतक-यांना ताब्यात घेऊन कोंबुन ठेऊन कंम्पनीस चोरीने कोळसा भरून काढण्यास मदत केल्याचा आरोप शेतक-यांनी करत हे सरकार, शासन, पोलीस प्रशासन शेतक-यांचे की, उद्योगपती चे ? असा प्रश्न उपस्थितानी केला.
गुप्ता कोल वॉशरी च्या कोळसा धुळीमुळे प्रदुषित पाण्याने शेती पिकाचे अतोनात नुकसान होत असल्याने जिलाधिकारी डॉ. विपिन इटनकर व प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांसह मागिल महिन्यात कंम्पनी व शेतक-यासह भेट देऊन समस्या चे निरिक्षण केले होते. प्रदुषण नियंत्रण मंडळाने कोळसा वॉशरी च्या अधिका-यास आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्याचे निर्देश दिले होते. परंतु कंम्पनी व्दारे दुर्लक्षित करित असल्याने शेती पिकाचे व गावक-यांचे उडण्या-या कोळसा धुळीने अतोनात नुकसान होतच आहे.