आमटेजी ..
समाज सेवामृतात
दाटले आनंद घन
बाबाआमटे थोरवी
साक्ष दे आनंदवन
कुष्ठरोग निवाणार्थ
सार्थ दिधले जीवन
कार्यरत तेआमरण
सतत चालले हवन
मूक बधिर अंधांचे
साधले आत्मवर्धन
रमले गोर गरिबांत
असून स्वता सधन
रंध्रा रंध्रा गांधीवाद
शुध्द सत्व आचरण
अभय साधक असे
बापुजी नाम करण
मॅगसेसे सन्मानित
धन्य पद्म विभूषण
पुरस्कार उंची वाढे
धारण करे आपण
नर्मदा बचाव कार्य
काढे तुझीआठवण
प्रकल्प स्थापिले ते
वन्य जीव संरक्षण
लोकबिरादरीसंस्था
करी जन जागरण
आदरांजली वाहता
सतत जागी स्मरण
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306096.
Users Today : 56