देवेंद्र सिरसाट नागपूर
ऑलइंडीया पॅंथर सेनेचे हजारो कार्यकर्ते धडकले हिवाळी अधिवेशनावर, जोरदार घोषणाबाजीसह आंदोलकांचा आक्रोश दिसत होता. इंदोरा मैदान येथून निघालेल्या मोर्च्यात महिलांची संख्या मोठी होती, या मोर्चाचे नेतृत्व ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी केले.
यावेळी दिपक केदार यांनी सरकारला इशारा दिला. गायरान गरीब कुटुंबांचे आधार आहे, त्यांच्या तोंडचा घास ओडू नका, त्यांच्या झोपड्या पाडू नका. 2022 पर्यंत गायरान नियमित करून सातबारा द्यावा. तहसीलदार नोटीस देत आहे त्यांना आवरा, काय भूमिका घ्यायची ती घ्या पण एवढं लक्ष्यात ठेवा उद्रेक आहे. पँथर गायरान धारकांच्या पाठीशी आहे याद रखा, गायरान काढण्यासाठी जेसीबी आला तर त्याचा चुराडा केला जाईल असा इशारा ही या वेळी केदार यांनी सरकारला दिला.मागण्या करून थकलो आहोत असे म्हणत आता जसाचे तसे उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. सरकारला सत्तेची मस्ती चडलेली असुन त्यांना संवेदना राहिलेल्या नाहीत, दलित अत्याचारावर सरकार मूग गिळून बसले आहेत. आमचे मुडदे पडत आहेत, राज्यात दलित अत्याचारावर कुणीही बोलत नाही असंही केदार म्हणाले
एकमेव ऑल इंडिया पँथर सेना लढत आहे त्यामुळे लक्ष्यात घ्या, अमुक शक्ती तमुक शक्ती ही केवळ चर्चा आहे. खरी भीमशक्ती ही पँथरशक्ती च आहे असा इशारा ही त्यांनी आंबेडकरी चळवळीतील इतर
संघटनांना दिला.सहा दिवस झाले अधिवेशन सुरू आहे काहीही राज्याच्या हिताचे घडत नाही केवळ उनेधूने काढून वेळ वाया घालवला जातोय. शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, दलित यांच्या प्रश्नांवर सरकार गप्प गार आहे. रोज एक सस्पेन्स सुरू आहे हा म्हणतो मी बॉम्ब फोडेल तो म्हणतो मी बॉम्ब फोडेल यांचा बॉम्ब म्हणजे एकमेकांच्या अंडरपॅंट ची कंपनी कोणती हे शोधणे हा यांचा बॉम्ब, एकमेकांना भोंगळ करण्यात जास्त यांना इंटरेस्ट आहे त्यामुळे हे अधिवेशन कसलं हे तर बिगबॉस चे घर झालं आहे.यांना अणुबॉम्ब काय असतो ते जनता दाखवले यांची सरकार जन आक्रोश अणुबॉम्ब लावून उद्ध्वस्त करू!
बुद्ध लेण्यावरील देवी देवतांचे अतिक्रमण तात्काळ काढा आता आमचा अंत संपलाय ऑपरेशन राबवून कचरा उचलून फेकण्याचे काम आम्ही हाती घेऊ याची दखल घ्या.यांच्याकडून अपेक्षा नाहीत, लोकात जाऊन यांचा खरा चेहरा उघडा पडला जाईल. बेरोजगारांना नोकरी नाही तर ऑनलाईन रम्मी दिली खेळायला तात्काळ ही रम्मी सट्टेबाजी बंद करा. बेरोजगारांचा तुम्ही जुगार केलाय.