देवेंद्र सिरसाट नागपूर
हिंगणा तालुक्यातील सतीश सोमकुंवर हे एक चळवळीचे समाज प्रबोधनकार असून ते संत गाडगेबाबा यांच्या वेशभुषेत संगीतमय प्रबोधन करतात तसेच थोर संत महापुरुषांचे समतावादी विचार, समाजातील अन्धश्रद्धा निर्मूलन कार्य, व्यसनमुक्ति, आरोग्य स्वच्छता व पर्यावरण, आणि भारतीय संविधानाचा जागर हे त्यांच्या प्रबोधनाचे मुख्य विषय आहेत. त्यांच्या या समाज प्रबोधन कार्याची दखल घेत यशवंत भारती लोककल्याण संस्था, नागपूर यांच्या वतीने आज दिनांक 27 डिसेम्बर 2022 ला विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन येथे मा. रमेश ठाकरे माजी सल्लागार जागतिक बँक व कृषि तदन्य, मा. पी. शिवस्वरुप रिजनल डायरेक्टर इंदिरागांधी मुक्त विद्यापीठ, मा. डॉ. प्रदीप आगलावे जेष्ठ आम्बेडकरी विचारवंत साहित्यिक व लेखक, मा. भूषण भस्मे अध्यक्ष यशवंत भारती लोककल्याण संस्था, नागपूर व मा. पूजा भस्मे अध्यक्षा सावित्रीबाई फुले महिला मंच यांच्या हस्ते आणि अनेक मान्यवारांच्या उपस्थित सामाजिक प्रबोधन कार्यासाठी विदर्भ भूषण पुरस्कार- 2022 प्रदान करून गौरविन्यात आले. त्या बद्दल प्रबोधनकार सतीश सोमकुंवर यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होते आहे . त्यांच्या पुढील वाटचाली करिता त्यांच्या मित्र परिवारकड़ून शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत. तसेच यशवंत भारती लोककल्याण संस्था, नागपूर यांनी पुरस्कार प्रदान केल्याबद्द सतीश सोमकुंवर यांनी संस्थेचे आभार व्यक्त केले आहे.