थांबा तुम्हालाही अटक होऊ शकते;सपोनि अनमोल केदार सोयगाव
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील व सोयगाव शहरात थर्टी फर्स्ट…मद्यप्रेमींना मद्यसेवन करण्यासाठी निमित्त असलेला सर्वात मोठा दिवस जो अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलाय या दिवशी अनेकांनी हॉटेल्स व धाबा या ठिकाणी जाऊन निवांत मद्यप्राशन करण्याची प्लॅनिंग ही केली असेल.. परंतु सावधान यावर्षी औरंगाबाद राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर तुमच्यावर असणार आहे. या वर्षाअखेर येणाऱ्या थर्टी फर्स्ट च्या पार्श्वभूमीवर कोणत्याही व्यक्तीकडून विना मद्यप्राशन परवाना मद्यप्राशन खरेदी अवथा सेवन केल्याचे आढळल्यास सदर व्यक्तींविरुद्ध गुन्हे नोंदविले जाणार असल्याचं राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद विभाग विभागामार्फत सांगण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांना मद्यप्राशन करावयाचे त्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यप्राशन परवाना काढावा लागणार आहे.सोयगाव व फर्दापूर शहरतील हॉटेल्स व ढाब्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येईल.राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद विभागाचे विभागीय उप आयुक्ता यांनी दिलेल्या निर्देशानुसार तसेच औरंगाबाद जिल्हयाचे अधीक्षक श्री.मनिष कालवनिया यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद व फर्दापूर, सोयगाव शहरतील एकूण सात ते आठ ढाबे आहेत.अशे आवाहन पोलिस सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार सोयगाव पोलिस स्टेशनच्या वतीने नागरिकांना अहवान करण्यात येत आहे.
सोयगाव कोणीही विना मद्यप्राशन परवाना मद्यप्राशन खरेदी अथवा सेवन केल्यास सदर व्यक्तींविरुद्ध गुन्हे नोंदविले जातील याची दक्षता नागरीकांनी घेण्यासोबच सोयगाव येथे अवैध मद्यविक्री ,अवैध धंदे व वाहतूकी विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असून अश्या अवैध मद्याबाबत माहिती असल्यास सोयगाव पोलिस स्टेशनला कार्यालयास कळवावे माहिती देण्यात यावी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले येईल असे अहवान सपोनि अनमोल केदार सोयगाव यांनी केले आहे.
Users Today : 37