औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे होत असलेल्या २५ जानेवारी ते ३० जानेवारी २०२३ रोजीच्या कुंभमेळा करीता होणाऱ्या हिंदू गोर बंजारा लभाना नायकडा समाजाच्या महा कुंभमेळासाठी सहा ठिकाणी तात्पुरते बसस्थानक उभारण्यात येणार आहे.त्यात जळगाव जिल्ह्यातील तीन भुसावळ, फत्तेपूर, जामनेर बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येकी एक म्हणजे मोताळा, फर्दापूर, भोकरदन या प्रत्येक जिल्ह्यातील एकेक स्थानकाचा व्यवस्था करण्यात आलेली आहे.अशी माहिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण (नादांतांडा) यांनी उपसंपादक गोकुळसिंग राजपूत यांच्याशी बोलताना सांगितले. प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी गेल्या आठवड्यात या कुंभ मेळाव्याची आढावा बैठक घेतली होती त्याच विविध विभागवार जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या त्यानुसार एसटी महामंडळाच्या वतीने फत्तेपूर जामनेर व भुसावळ बस स्थानक उभारण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथे जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे व औरंगाबाद जिल्ह्यातील फरदापुर येथेही तात्पुरते बस स्थानके उभारण्यात येतील तसेच या चारही जिल्ह्यातून जामनेर तालुक्यातील गोदरी येथे महा कुंभामध्ये येण्याकरिता येथे तात्पुरते ज्यादा बसेस सोडण्यात येतील गोदरी येथे होणारा महा कुंभ मेळावा शांततेत पार पाडावा आणि भाविकांना या मेळाव्यामध्ये सुरक्षितपणे सहभागी होता यावे या दृष्टीने पोलीस विभागाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे या मेळाव्यासाठी अन्य जिल्ह्यातूनही पोलीस कुमक मागवण्यात येणार आहे तसेच राज्य राखीव पोलीस दलाची ही मदत घेण्यात येईल नेमलेल्या बंदोबस्तातील कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधता यावा म्हणून गोदरी मध्ये नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात येईल हा झाला एसटीच्या बस परवासांचा
प्रश्न परंतु या विभागात रेल्वे नसल्यामुळे भुसावळ येथूनच रेल्वेने येणाऱ्यांची व्यवस्था होईल व औरंगाबादलाही येणाऱ्या प्रवासाची एस टी द्वारेच व्यवस्था होईल पुढील भागामध्ये बघूया साधु संत महंत मंत्री मुख्यमंत्री या कुंभमेळ्यामध्ये येत असल्यामुळे गोदरी या परिसरामध्येच तीन हेलिपॅड ची ही व्यवस्था करण्यात आलेली असून तीन ठिकाणी अलग अलग प्रकारचे हेलिपॅड तयार केलेले असून ते कोठे व कसे केलेले आहे.तरी भाविक भक्तांनी या पाच दिवसीय कुंभमेळाचा लाभ घ्यावा असे आवाहन जयप्रकाश चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष यांनी केले आहे.
Users Today : 37