वैजापुरात  मौ,आझाद विद्यालयात पालिका शाळेत आनंदनगरी भरऊन २०२२ ला निरोप व२०२३ चे स्वागत

Khozmaster
1 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर
येथील पालिकेच्या मौ,आझाद विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांनी  वर्ष २०२२ला आनंद नगरी आयोजित करून निरोप तर २०२३चे जोरदार स्वागत करण्यात आले,मुलांनी आनंद नगरीत  खमंग पदार्थ आणले होते,या आनंदनगरीचे उदघाटन सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले,या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेवा निवृत्त स्वच्छता निरीक्षक मोती हिवाळे होते तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जी,जी, राजपूत होते,शालेय विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान व्हावे,त्यांना व्यवहार कळावा, त्यांच्या बुद्धी कौशल्याना चालना मिळावी या साठी असे कार्यक्रम उपयुक्त असतात असे प्रतिपादन श्री राजपूत यांनी केले व उदघाटन केले,विद्यार्थ्यांनी खमंग पदार्थांचे स्टॉल ,चिवडा,भेळ,मसाले डोसा, भजे, पोंगे, मिसळ,अशा विविध पदार्थांचे स्टाल लावले होते,यातुन त्यांनी बरीच कमाई केली ,शहरातील  नागरिकानी
ही यात भाग घेऊन मुलांच्या स्टॉल वरून बऱ्याच वस्तू
खरेदी केल्या श्री राजपूत यांनी “गेले ,गेले, गेले मागचे वर्ष गेले,आले,आले नवीन वर्ष आले ,अशा गीताला गाऊन गत   वर्षेला निरोप दिला तर२०२३ चे स्वागत केले,या प्रसंगी मुख्याध्यापक जी,जी ,राजपूत,स,शि,
बी,बी,राजपूत,लता सुखासे, नीता पाटील, जयश्री बंड, सुवर्णा बोर्डे,ज्योती दिवेकर,संदीप शेळके,सुनीता वसावे, श्रीमती शेलार,श्रीमती जेऊरकर, यांनी सहभाग
नोंदविला,”सूत्र संचलन बी,बी,जाधव यांनी केले,आभार
सुवर्णा बोर्डे यांनी मानले(फोटो कॅप्शन-उदघाटन नंतर खमंग पदार्थांचा स्वाद घेतांना धोंडीराम राजपूत, मोती
हिवाळे,)
0 9 4 7 4 8
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *