सोयगाव परिसरात ढगाळ वातावरणामुळे हरभरा, गहू, पिकांना मोठा फटका; किडीचा प्रादुर्भाव वाढला;

Khozmaster
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात मागील काही दिवसांपासून अनेक भागात ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसत आहे. त्यातच रोगराईमुळे औषध फवारणीचा खर्च वाढल्याने बळीराजाचा चिंता वाढली आहे.
थंडी गायब झाल्यामुळे गहू, हरभरा, रब्बीचा कांदा आदी पिकांवर रसशोषक किडी वाढल्याने शेतकरी वर्गाला चिंता भेडसावत आहे. परिसरातील रब्बीच्या पेरणी पुर्ण झाली असून कांदा व गहु पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. भरपुर पाऊस झाल्याने थंडीचे प्रमाण जास्त राहील असा शेतकऱ्यांचा अंदाज होता मात्र चार पाच दिवसापासून थंडी गायब झाल्याने उगवलेल्या पिकांची वाढ खुंटली असून रसशोषक किडीच्या विळख्यात सापडली आहेत. ढगाळ वातावरण  या ढगाळ वातावरणामुळे रब्बीतील हरभरा व गहू या पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे या पिकांची वाढ खुंटली असून, या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आलेले आहेत. तसेच, वाढलेल्या तुरीवर ही कीड निर्माण झाली असल्यामुळे शेतकरी अधिकच चिंतातूर झाले आहे.
त्यासोबतच पिकविमा ही शेतकऱ्यांनासुद्धा मिळाला नसल्यामुळे शेतकरी हतबल झालेले आहेत. तसेच, नुकसानभरपाई न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत आहेत, असे असतानाही शेतकऱ्यांनी रब्बी हंगामामध्ये गहू व हरभरा हे पीक घेतले आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे या पिकांवर किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे शेतकरी पिकांवर फवारणी करताना दिसत आहे. अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
0 9 4 7 4 8
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *