आ.सौ.श्वेता ताई महाले यांची विधानसभेत मागणी
नागपुर
आणीबाणी काळामध्ये ज्या बंदीवानांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी बंदिवास भोगला त्यांच्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळात सुरू झालेले आणि आघाडी शासनाने बंद केलेले तसेच त्या काळात ज्यांना मानधन मिळाले नाही त्यांना व त्यांच्या वारसांना तातडीने मानधन देण्याची जोरदार मागणी आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी नागपूर येथील मविस नियम 293 वर बोलताना केली.दि 27/12/2022 रोजी नागपुर येथील सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मविस नियम 293 अन्वये सुरु असलेल्या चर्चेत सहभागी होताना आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातील विविध लोकोपयोगी मागण्या मांडून सरकारचे लक्ष वेधले आहे.दिनांक २५.०६.१९७५ ते दिनांक ३१.०३.१९७७ या कालावधीत घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान/ यथोचित गौरव करणेबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले होते. या धोरणांतर्गत पात्र व्यक्तींना मानधन वितरीत करण्यात आलेले आहे.परंतू उक्त या कालावधीत घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा सर्वच व्यक्तींना मानधन लागू झाले नाही . त्यामुळे ज्यांनी बंदिवास सोसला त्याचे पुरावे न मिळाल्याने त्यांच्या करीता शासनाने शपथ पत्राच्या आधारे अर्ज मागविण्यात आले.परंतु मानधन सुरू झाले नाही.मध्यंतरी कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात महाविकास आघाडी दिनांक ३१ जुलै, २०२० च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला.त्यामुळे युती शासनाच्या काळात सुरू झालेली ही मानधन योजना बंद तर पडलीच परंतू ज्या पात्र लाभार्थ्यांना ही योजना लागू झाली नाही ते सुद्धा आघाडी सरकारने योजना बंद केल्याने या योजनेपासून वंचित राहिले.आता पुन्हा युतीचे सरकार आल्याने आणिबाणी कालावधीत लढा दिलेल्या व्यक्तींचा सन्मान / गौरव करावयाची बंद करण्यात आलेली योजना पुन्हा सुरु करण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाने दिनांक १४ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीमध्ये घेतला. त्यानुसार सदर योजना दिनांक १ ऑगस्ट, २०२२ पासून नव्याने सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे मागील काळात वंचित राहिलेले , बंद काळात मानधन न मिळालेल्या सेनानी किंवा त्यांच्या वारसांना तातडीने मानधन सुरू करण्यात यावे अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली.
अंशतः बाधित देवदरीचे पुनर्वसन करा
माझ्या चिखली विधानसभा मतदारसंघातील पेनटाकळी प्रकल्पातील अनेक वर्षापासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या घाणमोड ,मानमोड , पांढर देव या गावांचा पुनर्वसनाची कामे सुरू कर,ण्यात आली आहे .परंतु पेनटाकळी प्रकल्पातीलच देवदरी हे गाव अंशतः बाधित होत आहे . या अंशतः बाधित होणाऱ्या गावाचे सुद्धा पुनर्वसन करण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री यांनी या सभागृहाला दिलेले आहे . परंतु अद्याप पर्यंत या देवदरी गावाच्या पुनर्वस्तासाठीच्या कोणत्याही हालचाली शासनाकडून झालेल्या नाही. माझी शासनाला विनंती आहे की अंशतः बाधित होणाऱ्या देवदरी गावासाठीचे पुनर्वसन ला सुद्धा तातडीने मान्यता देण्यात यावी अशी मागणी करुन घाणमोड , मानमोड आणि पांढरदेव या गावांच्या पुनर्वसनासाठी भरघोस निधी दिल्या बद्दल मानले आभार सत्तारूढ झालेल्या नामदार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सरकारने पेनटाकळी प्रकल्पातील घाणमोड , मानमोड आणि पांढरदेव या गावांच्या पुनर्वसनासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी आभार देखिल व्यक्त केले.
योगायोग
आ सौ श्वेता ताई महाले यांनी २०१९ च्या नागपुर येथीलच हिवाळी अधिवेशनात २७ डिसेंबर २०१९ रोजी २५१५ तसेच इतर प्रस्तावीत कामावर दिलेली स्थगिती उठविण्यात यावी त्याचप्रमाणे विदर्भाच्या मागासलेपनावर सिंचनाचे अनुशेषाकडे लक्ष वेधले होते . वैनगंगा ते नळगंगा नदीजोड ह्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मंजुरी दिलेल्या योजनेमध्ये पैनगंगा नदीजोडणी केल्यास त्याचा फायदा बुलडाणा व वाशीम जिल्ह्यातील गावांना होईल, त्यामुळे त्याकडे लक्ष देण्याची मागणी आघाडी सरकारकडे केली होती. परंतू आघाडी सरकारने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही . परंतु योगायोग असा की २७ डिसेंबर २०२२ रोजीच आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या लक्षवेधीला उप मुख्य मंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर देऊन
वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्पात पैनगंगा प्रकल्प जोडण्याची घोषणा बरोब्बर दोन वर्षानी करणे हा हा देखील एक योगायोगच म्हणावा लागेल असेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्पाला पैन गंगा जोडल्याने मानले आभार
विरोधी पक्षाच्या नियम 293 चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे अध्यक्ष महोदय सर्वप्रथम त्यांनी या विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने या आधुनिक महाराष्ट्राचे भाग्यविधाते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून विरोधी पक्षाच्या लोकं प्रतिनिधींनी त्या ठिकाणी विदर्भावरती कशा पद्धतीने अन्याय झाला हे त्या ठिकाणी मांडलं आणि ऐकत असताना सदस्य विरोधी पक्षातले हे विसरले की गत पाच वर्षाचा कार्यकाळ सोडला तर कायम विरोधी पक्षच त्या ठिकाणी सत्तेमध्ये होता . परंतु सत्तेत असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीने कायम विदर्भावती अन्याय कशा पद्धतीने करता येईल अशी भूमिका त्या ठिकाणी ठेवली असल्याचा जोरदार प्रहार देखील त्यांनी करून
आज खऱ्या अर्थाने या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना संजीवनी देणारा वैनगंगा नळगंगा पेनगंगा मान्यता या विदर्भातला शेतकरी आज धन्य होईल अशी आशा व्यक्त केली.
Users Today : 28