ना.देवेंद्र फडणवीस यांचे आ सौ श्वेता ताई महाले यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर
नागपूर
पश्चिम वाहिनी प्रकल्पातील व्यय होणारे पाणी खडकपूर्णा व पेनटाकळी प्रकल्पास मिळाल्यास देऊळगाव राजा व चिखली तालुक्यातील वंचित क्षेत्रास लाभ देणे शक्य आहे. तथापि, सविस्तर सर्वेक्षण केल्यानंतरच पाणी उपलब्धता, व्यवहार्यता व त्यानुसार लाभक्षेत्र निश्चित करणे शक्य होणार असल्याचे लेखी उत्तर उपमुख्य मंत्री तथा जलसंपदा मंत्रि ना देवेंद्र फडणवीस यांनी आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी विचारलेल्या तारांकीत प्रश्नांला उत्तर देताना दिले .
आ.सौ.श्वेता ताई महाले यांनी तारांकीत ५३३३७ उपस्थित करून बुलढाणा जिल्हयातील खडकपूर्णा व पेनटाकळी या दोन प्रकल्पासाठी पश्चिम वाहिनी प्रकल्पातील व्यय होणारे पाणी मिळण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.गोदावरी खोऱ्यातील ३ टीएमसी पाणी खडकपूर्णा प्रकल्पास उपलब्ध करून दिल्यास यामधील काही पाणी खडकपूर्णा प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक ४ मधील उपसाद्वारे उचलून पेनटाकळी प्रकल्पात घेता येणे शक्य आहे. त्यामुळे खडकपूर्णा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या २०० ते ३०० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असून या भागातील सिंचनापासून वंचित राहिलेले ८ ते १० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते.यासाठी पश्चिम वाहिनी प्रकल्पातील व्यय होणारे ३ टीमसी पाण्यापैकी काही पाणी या दोन्ही प्रकल्पासाठी देण्याबाबत आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी केली होती.
त्या अनुषंगाने आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी याबाबत नागपुर हिवाळी अधिवेशनात तारांकीत उपस्थित केला होता.
त्यावर गोदावरी खो-यातील अतिरिक्त पाणी उपलब्धता व तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता निश्चित झाल्यानंतरच खडकपूर्णां पेनटाकळी प्रकल्पात किती पाणी उपलब्ध होवू शकते हे निश्चित करणे शक्य आहे. खडकपूर्णा प्रकल्प हा सिंचन आवर्तनासाठी नियोजित असुन गोदावरी खोऱ्यातील काही अतिरिक्त पाणी प्रकल्पास उपलब्ध झाल्यास, खडकपूर्णां प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक ४ मधील उपसाद्वारे पावसाळ्यात पेनटाकळी प्रकल्पात पाणी घेता येऊ शकते. त्यामुळे पश्चिम वाहिनी प्रकल्पातील व्यय होणारे पाणी खडकपूर्णा व पेनटाकळी प्रकल्पास मिळाल्यास देऊळगाव राजा व चिखली तालुक्यातील वंचित क्षेत्रास लाभ देणे शक्य आहे. तथापि, सविस्तर सर्वेक्षण केल्यानंतरच पाणी उपलब्धता, व्यवहार्यता व त्यानुसार लाभक्षेत्र निश्चित करणे शक्य असल्याचे उत्तर मिळाले आहे
पाणी उपलब्धता प्रमाण पत्र मिळविण्यासाठी प्रयत्न करणार.
आ.सौ.श्वेता ताई महाले पाटील
पश्चिम वाहिनी प्रकल्पातील व्यय होणारे पाणी खडकपूर्णा व पेनटाकळी प्रकल्पास मिळण्यासाठी प्रकल्पाचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. सदर पाणी प्रस्ताव ज्या खोऱ्यात प्रकल्प आहे त्या खो-यातील जलसंपत्ती मालकी हक्क असलेल्या महामंडळ मुख्य अभियंताची यांचे पाणी उपलब्धतेबाबत व प्रस्तावित बांधकामाविषयी सहमती आवश्यक आहे. त्याअनुषंगाने याबाबतचा अहवाल संबंधित प्रादेशिक कार्यालयाचे पत्र दि.२१/११/२०२२ अन्वये मुख्य अभियंता जलसंपदा विभाग, औरंगाबाद यांची सहमती घेण्यासाठी सादर आला आहे. सदर प्रमाण पत्र मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी आ सौ श्वेता ताई महाले पाटील केले आहे.