बौद्ध विद्यार्थिनीला अंधत्व: (?) (बोम्बे पब्लिक हायस्कुल जवाबदार) 

Khozmaster
2 Min Read
मुंबई दि.(प्रतिनिधी)
गौतम नगर, रमाबाई आंबेडकर नगर पवई येथील शाळेत एका बौद्ध गरीब विद्यार्थिनीस शालेय प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अंधत्व आले असून पालकांनी पोवई पोलीस ठाणे, एस.सी, एस.टी व महिला आयोगाकडे धावं घेतली आहे.
इयत्ता नववी वर्गात शिक्षण घेणाऱ्या नंदिनी बाळू चौरे वय 13 वर्ष, वडील नळ कामगार असून अत्यंत गरीब व हलाखीच्या परिस्तिथीत शाळा प्रशासनाच्या सर्व आर्थिक अटी शार्थिंचे पालन करून शिक्षण देत आहेत.
शाळेत शिक्षक उपस्थित नसतांना मुलांचा गोंधळ चालू असता फुल पट्टी फेकून मारामारी करतांना अभ्यास करत शांत बसलेल्या नंदिनी नामक विद्यार्थिनी च्या डोळ्यावर ती पट्टी लागली आणी रक्त प्रवाह होऊ लागला.मात्र: शाळा प्रशासनाने जाणीवपूर्वक मुलीच्या डोळ्याच्या दुखापती कडे दुर्लक्ष केले. फक्त पाणी मारून अर्धा तासभर तसेच बसवण्यात. त्यानंतर विद्यार्थिनीच्या आईला बोलावण्यात येऊन शाळेतील कोणताही कर्मचारी सोबत न देता तसेच पाठवले.
एकंदरीत शाळेत दुखापत झाली असून या गोष्टीला शाळा प्रशासन जवाबदार असून विद्यार्थिनीला आलेले अंधत्व: दूर करून तिच्या डोळ्यांना दृष्टी मिळवून देण्यासाठी उपचारार्थ होणारा सर्व खर्च शाळा प्रशासनाने करावा अशी मागणी पालकांसह् समाजिक संघटना व नागरिकांची आहे.डोळ्यांना दृष्टी मिळवण्यासाठी शाळेने खर्च नाही केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा चे संस्थापक अध्यक्ष पूज्य भन्ते शिलबोधी यांनी दिला असून संघटनेचे महासचिव विद्रोही पत्रकार पॅन्थर डॉ. राजन माकणीकर विद्यार्थिनीच्या न्यायलयीन लढा लढणार असल्याचे सांगितले.
0 8 9 4 8 1
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *