एसटी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारीपदी आयपीएस अधिकारी प्रियंका नारनवरे यांची नियुक्ती

KHOZ MASTER
1 Min Read

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई :

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एसटी महामंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या एसटी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी पदावर शासनाने अखेर नियुक्ती केली असून उप-महानिरीक्षक दर्जाच्या आयपीएस अधिकारी प्रियंका नारनवरे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

एसटी महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता यंत्रणेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित पदावर अनुभवी पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार शासनाने ही नियुक्ती जाहीर केली.

प्रियंका नारनवरे या अनुभवी आणि कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. पोलीस प्रशासनातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ एसटी महामंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेला तसेच दक्षता यंत्रणेला निश्चितच होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, एसटी महामंडळातील सुरक्षा, प्रवासी संरक्षण, गैरप्रकारांवर नियंत्रण तसेच अंतर्गत दक्षता यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी या नियुक्तीकडे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

0 9 7 6 4 6
Users Today : 46
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *