वर्ष पूर्ती …

Khozmaster
1 Min Read
वर्ष पूर्ती …
स्वागत नवीन वर्षा
सजली सुंदर धरती
निरोप  जुन्या  वर्षा
आसवा येई  भरती
सिंहावलोकन  करा
जाणूनि घ्या माहिती
इतिहास  सांगे सत्य
समजूनि  घ्या महती
मध्येचं थांबून पहावे
झाली  केवढी प्रगती
उद्दिष्ट गाठण्यासाठी
किती वाढवावी गती
कोण  आपले  परके
कसे ते सखे  सोबती
कोण शत्रू मित्र कोण
जोडावी नवीन नाती
काय चुकले जाणावे
टिकाकार हवे संगती
गाडी धावेलं भरधाव
चुकीची होता दुरुस्ती
महोत्सव नसो केवळ
साजरी सार्थ वर्षपूर्ती
शत्रूने   करावी  स्तुती
शोभावी  उत्सव मूर्ती
– हेमंत मुसरीफ पुणे. 
  9730306996.
0 9 4 5 6 1
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *