सोहळा

Khozmaster
1 Min Read
सोहळा ..
सोपस्कार  न केवळ
रे नवीन वर्ष सोहळा 
आप्त  मित्र एकत्रीत
सकल जनांचा मेळा
विखुरलेल्या मित्रांना
निमीत्ते करावे गोळा
शत्रूस  करे आमंत्रित 
विवादा लावा  टाळा
चुकले  काय आपले
जरूर सांगा सकळा
दोष सहर्ष  स्विकारा
श्वास घ्यावा मोकळा 
सिंहावलोकन  करी
ते काय आले फळा
चाललो  कशी  वाट
आठवावे भुतकाळा 
पुनश्च  नको  तसदी
सोसल्या ज्या कळा
चुका घ्या रे  जाणून 
पुढल्या वेळी  टाळा 
– हेमंत मुसरीफ पुणे. 
  9730306996.
0 9 4 6 4 7
Users Today : 61
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *