पोलीस ठाणे गंगापुर हद्यीतील पेंढापुर शिवारात ऊसाच्या शेतात खून

Khozmaster
4 Min Read
 पुरवा नष्ट करुन करणाऱ्या आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेकडून ३६ तासाच्या आत पर्दाफाश
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मेंढापूर येथे फिर्यादी नामे नितीन प्रकाश जमधडे वय २९ वर्ष, व्यवसाय शेती रा. पाटोदा ता.जि. औरंगाबाद यांनी पोलीस ठाणे गंगापुर येथे फिर्याद दिली की, त्यांचा मोठा भाऊ सुनिल जमधडे हा त्याचे मुले व पत्नी सोबत शरणापुर येथे राहत होता, तो एम.आय.डी.सी कार्यालय रेल्वे स्टेशन रोड औरंगाबाद येथे कर्मचारी पदावर काम करत होता. दिनांक ०२/०१/२०२३ रोजी पाटोदा गावाचे पोलीस पाटील लहू मुचक यांनी माहिती दिली की, सुनिल चा ढोरेगांव येथे खुन झाल्याची माहिती मिळाली असुन ढोरेगांव जवळील पेंढापुर फाटयाच्या मागील ऊसाचे शेतात त्याचे प्रेत पडलेले आहे. त्यावरुन माझे इतर नातेवाईकां सोबत पेंढापुर जवळील फौजी ढाव्याच्या मागील पेंढापुर जाणारे रोडलगत ऊसाचे शेतात जावुन पाहिले असता ऊसाच्या वाढयाच्या खाली माझा मोठा भाऊ सुनिल जमधडे याचे प्रेत आढळून आले कोणीतरी अज्ञात . इसमाने अज्ञात कारणासाठी त्याचा चेहरा विद्रुप केला. वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरुन पोलीस ठाणे गंगापुर येथे गु.र.नं ०३ / २०२३ कलम ३०२, २०१ भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल आहे.सदर गुन्हयांचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असतांना त्यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून व तांत्रीक विश्लेषणावरुन खात्रीलायक माहिती मिळाली की, मयत सुनिल प्रकाश जमधडे हा दिनांक ०१/०१/२०२३ रोजी १७:३० वाजे दरम्यान पंढरपुर येथील विरांश वाईन शॉप येथे पान रांजणगांव (खुरी) ता. पैठण येथील इसम नामे अक्षय बापूसाहेब विर व त्याचे सोबतच्या अनोळखी इसमासह दारु विकत घेवून पिण्यासाठी गेला होता, अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अक्षय बापुसाहेब वर वय २१ वर्ष रा. पान रांजणगांव (खुरी) ता. पैठण याचा त्याचे राहते गांवी शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली देऊन दिनांक ०१/०१/२०२३ रोजी १७:३० वाजता तो व त्याचा मित्र मयत सुनिल जमधड यास भेटले व त्याचेकडील मोटार सायकल व पैसे घेण्यासाठी त्यास पंढरपुर येथील विरांश वाईन शॉप येथून दारु विकत घेऊन त्यास दारु पाजुन त्याचे मोटार सायकलवर ढोरेगांव येथे जेवणासाठी जात असतांना रस्त्यात भांडण झाले. तेव्हा सुनिल जमधडे यास काठीने मारहाण केली, त्यानंतर त्यास ढोरेगांव ते पेंढापुर जाणारे रोडलगत फौजी ढाब्याच्या पाठीमागे एका ऊसाचे शेतात घेऊन गेलो व माझ्या मित्राने त्याचा रुमालाने गळा आवळला व मी त्याचे गळ्यावर पाय ठेवुन माझे मोबाईल मध्ये त्याला मारत असतांनाचे फोटो काढले. माझ्या मित्राने सुनिल जमधडे याची ओळख पटू नये म्हणुन त्याचे तोंडावर दगडाने मारुन त्याचा चेहरा विद्रुप करुन त्यास जिवे ठार मारले, अशी कबुली दिल्याने नमुद आरोपीस सदर गुन्हयाचे पुढील तपासकामी पोलीस ठाणे गंगापुर यांचे ताब्यात देण्यांत आले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस ठाणे गंगापुर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, श्री. मनिष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक श्री. सुनिल लांजेवार यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग गंगापुर श्री. प्रकाश बेले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोउपनि प्रदीप दूबे, सय्यद झिया, सफी दगडू जाधव, पोह लहू थोटे, नामदेव सिरसाठ, श्रीमंत भालेराव, दिपेश नागझरे, संजय घुगे, पोना दिपक सुरोसे, उमेश बकले, वाल्मीक निकम, संतोष डमाळे, पोकों ज्ञानेश्वर मेटे, रामेश्वर थापसे, योगेश तरमाळे, जिवन घोलप, संजय तांदळे, व पोलीस ठाणे एम. पैठण येथील पोह गणेश खंडागळे यांनी केली आहे.
0 9 4 7 4 6
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *