फत्तेपूर येथे चोरट्यांनी दोन दुकाने फोडली; ‘सीसीटीव्हीत चोरटे कैद

Khozmaster
2 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष यांचे भंसाली किराणा दुकान व शालीमार दारूचे दुकान दि. २/१/२३ जानेवारीच्या रात्री चोरट्यांनी किराणा फोडले. किराणा दुकानाच्या शटरचा सेंट्रल लॉक तुटला नाही. म्हणून या दुकानातून चोरट्यांना काही चोरता आले नाही. मात्र किराणा दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघं चोरटे कैद झालेले आहेत. त्यानंतर काही अंतरावर असलेले शालिमार या दारूच्या दुकानाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला.येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष बबलु भंसाली यांचे लहान भाऊ सुबोध भंसाली यांचे भंसाली किराणा दुकान बस स्थानकांवर मुख्य चौकात आहे. दि. २ रोजी रात्री या दुकानांच्या शर्टरचे दोघं कुलूपे चोरट्यांनी तोडले मात्र शटरचा मध्यभागी असणारा सेंट्रल लॉक चोरटे तोडू शकले नाहीत. या दुकानावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघे संशयीत चोरट्यांचे छायाचित्र कैद झाले आहे. तसेच चोरट्यांच्या हालचाली कैद झालेल्या आहेत. या फुटेजवरून पोलीस चोरट्यांचा शोध लावतील, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत किराणा दुकान फोडण्यास चोरटे अयशस्वी झाले त्यानंतर त्यांचा मोर्चा बसस्थानक परिसरात असणाऱ्या श्रीनिवास गौड (आण्णा) यांच्या शालीमार बियरबार या दारुच्या दुकानाकडे वळला. या दारूच्या दुकानाचा उत्तरेकडील दरवाजा चोरट्यांनी तोडून आत प्रवेश केला. दारूच्या दुकानातून चोरट्यांनी पंधरा हजाराचा ऐवज रोख, चार दारूचे मोठे बंपर, दोन क्वार्टर, दोन हजार रुपये किंमतीचे सिंगारेट पॉकीट व दारूच्या दुकानात लावलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण ज्या मशीनमध्ये जमा होते तेच सिस्टमचे मशीन चोरट्यांनी चोरून नेलेले आहे.
या घटनेमुळे व्यापारी वर्गात भितीचे व दहशतीचे वातावरण असून या अगोदर ही दुकाने फोडण्याचे अनेक प्रकार झालेले आहेत. भंसाली किराणा दुकान तर तिसऱ्यांदा फोडले गेले. चोरीच्या घटनेची माहिती येथील पोलीसांना दिली असून त्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही दिलेले आहेत. आता तरी पोलीसांनी चोरीचा तपास लावावा, अशी मागणी तंटामुक्तीचे अध्यक्ष बबलु भंसाली व शालीमार बियरबारचे मालक श्रीनिवास गौड यांनी केलेली आहे.अशी माहिती प्रशांत सुबोध भंसाली यांनी बोलताना सांगितले.
0 9 4 7 4 6
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *