संप..
असे अति धारधार
संप नावाचे हत्यार
बोथट होईल परंतु
वापरता वारं वार
चर्चा हवी सविस्तर
करा ग्राहक विचार
फूस लावे कुणीतरं
रे अंगा त्रागा संचार
तह शह झाल्यावर
अचूक करावा वार
जखमा प्रदिर्घ राही
विचार व्हावा त्रिवार
कधी दिसता हत्यार
होती दुष्मन ते गार
मागणी सहज पूर्ण
न करताचं प्रतिकार
कुणी करती व्यापार
मोह वाटतीलं अपार
नितीमत्ता निखळता
निष्प्रभ ठरेल हत्यार
मालक अन् संघटना
नको दोघांत अहंकार
दोन्हीचाके महत्वाची
सामंजस्य न् सहकार
-हेमंत मुसरीफ पुणे
9730306996
Users Today : 61