पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग समित्यांची पुनर्रचना; १० क्षेत्रीय कार्यालयांना किल्ल्यांची नावे

KHOZ MASTER
2 Min Read

पिंपरी,  :

Pimpri Chinchwad Municipal Corporation प्रशासनाने विद्यमान ८ प्रभाग समित्यांची पुनर्रचना करून एकूण १० प्रभाग समित्या (क्षेत्रीय कार्यालये) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले असून, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला ऐतिहासिक किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत.

महानगरपालिकेच्या १३ मार्च २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासनिक सुविधा अधिक प्रभावी करण्यासाठी आणि नागरिकाभिमुख सेवा सक्षमपणे देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतर्गत ३२ निवडणूक प्रभागांची विभागणी नव्या प्रभाग समित्यांनुसार करण्यात आली आहे. हा निर्णय २५ मे २०२६ पासून लागू होणार आहे.

नव्याने स्थापन करण्यात आलेली क्षेत्रीय कार्यालये

  • अ क्षेत्रीय कार्यालय – ‘राजगड’
    संत ज्ञानेश्वर चौक, निगडी प्राधिकरण, निगडी
    प्रभाग क्र. १३, १४ व १५
  • ब क्षेत्रीय कार्यालय – ‘सिंहगड’
    लिंक रोड, एल प्रो कंपनी आवार, चिंचवडगाव
    प्रभाग क्र. १७, १८ व १९
  • क क्षेत्रीय कार्यालय – ‘विजयदुर्ग’
    हॉकी स्टेडियम शेजारी, नेहरूनगर, भोसरी
    प्रभाग क्र. २, ९ व १०
  • ड क्षेत्रीय कार्यालय – ‘देवगिरी’
    औंध-रावेत रोड, रहाटणी
    प्रभाग क्र. २१, २७, २८ व २९
  • ई क्षेत्रीय कार्यालय – ‘शिवनेरी’
    पांजरपोळ संस्थेसमोर, नाशिक रोड, भोसरी
    प्रभाग क्र. ३, ४ व ५
  • फ क्षेत्रीय कार्यालय – ‘तोरणा’
    नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयाची जुनी इमारत, लोकमान्य टिळक चौक, निगडी
    प्रभाग क्र. १, ११ व १२
  • ग क्षेत्रीय कार्यालय – ‘पुरंदर’
    नवीन प्रशासकीय इमारत, दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीमागे, थेरगाव
    प्रभाग क्र. २२, २३ व २४
  • ह क्षेत्रीय कार्यालय – ‘प्रतापगड’
    महिला आयटीआय इमारत, कासारवाडी
    प्रभाग क्र. ३०, ३१ व ३२
  • ज क्षेत्रीय कार्यालय – ‘रायगड’
    मनपा वाहनतळ इमारत, ताथवडे
    प्रभाग क्र. १६, २५ व २६
  • ल क्षेत्रीय कार्यालय – ‘लोहगड’
    म्हाडा प्लॉट नं. ई-२, संत तुकाराम नगर, पिंपरी
    प्रभाग क्र. ६, ७, ८ व २०

महापालिकेच्या या निर्णयामुळे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून, नागरिकांना स्थानिक स्तरावर अधिक जलद सेवा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

0 9 7 1 5 7
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *