शेंदुर्णी येथे परमेश्वर विधीचे आचारण म्हणजे संन्यास; आचार्य श्री.महंत लोणारकरबाबा महानुभाव 

Khozmaster
2 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे बुधवार रोजी प.पु.मं.आचार्य श्री.लोणारकरबाबा महानुभाव जाळीचा देव अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष शेंदुर्णी येथे कार्यक्रमात बोलताना सांगितले की सर्व संगाचा परित्याग करून परमेश्वरास शरण जाणे, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ या सहा पडरुपींचा त्याग करणे मान-अपमान, निंदा-स्तुती, लाभ हानी, यश – अपयश, सुख दुःख, जय पराजय या सर्व गोष्टी बाजूला ठेवून परमेश्वराने सांगितलेला विधी आचरणात आणणे, परमेश्वराची आज्ञा हेच आपले जीवन असे समजून वैराग्य कंठून जीवन जगणे म्हणजे संन्यास दीक्षा होय, असे प्रतिपादन अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष व आचार माळिका सोहळ्याचे प्रवाचक महंत लोणारकर बाबा महानुभाव यांनी केले. शेंदुर्णी येथील गोपाला मेगा सिटीत
आचारमाळिका सोहळ्यात संन्यास दीक्षा विधी कार्यक्रमात ते बोलत होते. महंत कारंजकर बाबा महानुभाव (अमरावती) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संन्यास दीक्षा अनुसरण हे स्वामीच्या तत्त्वज्ञानाला, आचाराला, विचाराला आहे बालसंन्यासी असो की प्रपंच करून आलेला संन्यासी सर्वस्वाचा त्याग करून दोघे संन्यास दीक्षा घेतात, ते दोघेही सारखेच असून तेथे कोणताही भेदाभेद नाही. परमेश्वराने सांगितलेल्या आचार धर्माचे ते पालन करतात, असे महंत कारंजकर बाबा महानुभाव यांनी यावेळी बोलताना सांगितले. महंत जालनापूरकर बाबा महानुभाव (नांदेड), महंत अनंतव्यास बाबा जावळे (कामळज) आदींनी या वेळी प्रबोधन केले, तसेच दीक्षार्थीतर्फे मनीषा खानसोळे हिने मनोगत व्यक्त केले. या वेळी वसंत हरकळ (बोरी),आनंदा पाटील तळयी,मंदाताई पंडीतकर, कमलबाई लासुरकर,सुशिलाबिई अंजणकर, मनीषा खानसोळे, यांनी प्रप्रंचाचा त्याग करून संन्यास दीक्षा स्वीकारली.मा.श्री.गोविंद अग्रवाल शेंदुर्णी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.महंत काटे बाबा महानुभाव जाळीचा देव यांनी सूत्रसंचालन केले.तर महंत गोमेराज बाबा शहादा यांनी आभार मानले.यावेळी प.पु.मं.आचार्य श्री.पाथरीकरबाबा  महानुभाव जाळीचा देव,प.मं.गोंविदभाऊ लोणारकर,ई.श्री.विद्दाधर दादा महानुभाव,ई.श्री.धनराज बाबा
महानुभाव,ई.श्री.प्रवीणदादा लोणारकर, गोपीनाथ पुजारी, गोकुळसिंग राजपूत सावळदबारा,
आरुण पाटील लिहे दिगर, सुनील पाटील, अंबादास गोंधळी शेंदुर्णी व सतंमहंत, वासनिक, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती ई.श्री.प्रवीणदादा लोणारकर महानुभाव यांनी जेष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत यांच्याशी बोलताना दिली.
0 9 4 7 4 6
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *