उपाध्यक्षपदी तेजराव जाधव यांची सर्वानुमते निवड.
मालेगांव सैय्यद इमरान सामाजिक बातमी
मराठा सेवा संघाच्या मालेगांव तालुका अध्यक्ष पदी शिव शाहू फुले आंबेडकरी विचारांचे पाईक अनिल गवळी यांची तर उपाध्यक्ष पदी तेजराव पाटील जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.मराठा सेवा संघाच्या तालुका अध्यक्ष व विस्तारीकरणासाठी 3 जानेवारी रोजी तालुका कार्यालयात सभा घेण्यात आली . सभेच्या अध्यक्षस्थानी सुरेश पाटील राऊत हे होते . तसेच प्रमुख उपस्थिती मराठ सेवा संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्राचार्य वसंतराव अवचार , प्रा भरत आव्हाळे, प्रा संजाब वाहेकर , प्रा अनंतराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती . यापुर्वीचे तालुका अध्यक्ष प्रा राजा वामन यांची जिल्हा कार्यकारणी मधे निवड करण्यात आल्याने त्यांच्या रिक्त पदावर मराठा सेवा संघाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रा अनिल गवळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . तसेच तेजराव पाटील जाधव यांची तालुका उपाध्यक्ष पदावर निवड केली . तसेच तालुका सचिव पदावर बबनराव सोनाळकर , तालुका उपाध्यक्षपदी अमोल बोडखे , विश्वनाथ शिंदे , सहसचिव शिवाजी भुसारे , कोषाध्यक्ष गजानन इंगोले , मार्गदर्शक दतराव पोफळे , शेषराव जाधव तसेच सदस्य पदी कैलास पडघान , केशव देवकर व मनोज खिल्लारी यांचीही यावेळी निवड करण्यात आली .या सभेला नागेश कव्हर , नरहरी डोळे , भागवत पवार ,शिवाजी नवघरे, गजानन केळे ,मनोज वाझुळकर , जगन्नाथ रंजवे ,दत्तात्रय कावरखे , प्रवीण अवताडे , बाबुराव सदार , विश्वनाथ शिंदे यांची उपस्थिती होती.मराठा सेवा संघाची इतर सर्व कार्यकारिणी पूर्ववतच कार्यरत राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले .
Users Today : 25