देवेंद्र सिरसाट नागपूर
भारतिय अनुसंधान. केंद्र, आय. सी. ए. आर. व कृषि विज्ञान केंद्र नागपूर यांच्या वतीने एक दिवसीय आदिवासी उपयोजना कार्यक्रमा अंतर्गत “कान्होलीबारा शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड यातील आदिवासी शेतकरी सदस्यांचे प्रशिक्षण, प्रक्षेत्र भेट अनुसंधान केंद्राच्या टीमने घेतली, त्यात के. व्हीं. के नागपूर यांचे विदेशी भाजीपाला लागवड (ऑरगॅनिक पद्धतीने) त्यात ब्रोकोली, रंगीत कोबी, रंगीत ढोबळी मिरची, तसेच मिश्र दुहेरीतव बहु भाजीपाला व फळ लागवड, यांचे प्रत्येक्ष मार्गदर्शन केले, तत्पूर्वी आदिवासी शेतकरी यांच्या अडचणी व त्यांना येणाऱ्या योजनांची माहिती तेथील कृषि विज्ञान केंद्र चे प्राचार्य डॉ.रोकडे, के. वी. के . नागपूर मध्ये शेतकऱ्यांचे विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण कार्याबद्दल माहिती दिली त्यात शेळी पालन , दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री व्यवसाय यांचे बाबतीत मार्गदर्शन केले,आय.सी.ए.आरI चे मुख्य संचालक श्री बालब्रमानी यांनी विदेशी भाजीपाला पासुन जास्तीत जास्त उत्पन्न कसे वाढवू शकतो व मूल्य बद्दल मार्गदर्शन केले.तासेच आदिवासी विकास उपयोजना यांचे नोडल अधिकारी श्री चेना बाबू नाईक यांनी आदिवासी विकास योजना ची माहिती दिली. प्रो.सुनीता चव्हाण यांच्या माध्यमातून या संदर्भात परिपूर्ण कार्यक्रमाची माहिती शेतकऱ्यांना दिली
विशेष म्हणजे कान्होलीबारा येथील शेतकरी यांचा कापूसवेचणी बॅग देवून सन्मान करण्यात आला. यात कान्होलीबारा येथून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री रविचंद्र गव्हाळे, तसेच धोकर्डा , कोकर्डी, माथनी, चौकी, लखमापूर येथील २० शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला, तसेच १०००शेतकऱ्यांना मृदा चाचणी प्रपत्र व लाभ देण्याचा प्रयत्न आय.सी.ए.आर व के. वी. के नागपूर यांच्या माध्यमातून होईल व त्यांचा लाभ कान्होलीबारा शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड ला होईल असं मत प्रशिकषणार्थींनी नोंदविले.