देवेंद्र सिरसाट नागपूर
लुंबिनी बौद्ध विहार महिला मंडळ व नवयुग मंडळ हिंगणा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने लुंबीनी बुध्दविहार परीसरात दि. ३/१/ २०२३ ला सायंकाळी सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती साजरी करण्यात आली, समारोहाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, संत गाडगेबाबा, शाहू महाराज, यांच्या फोटोला माल्यार्पणासह अभिवादन करण्यात आले, अतिथींच्या स्वागता नंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहूने पुरणसिंग तथा सुरेश मानवटकर यांनी सावित्रीबाई फुले याच्या जीवनावर प्रकाश टाकला विशेष अतिथी राजकुमार बोरकर यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील संघर्ष उपस्थित जनतेला समजावून सांगितले, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. विजय इंगळे यांनी भावी पिढीला उद्देशून सावित्रीबाई फुले तथा संत गाडगेबाबा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत रविदास, पंजाबराव देशमुख या महापुरुषांचा संपूर्ण इतिहास उपस्थित महिला मंडळ व वस्तीगृहातील विद्यार्थि विद्यार्थिनींना अनेक उदाहरणे देऊन भावी पिढीला महापरुषांच्या ईतिहासाचा बोध घेण्याची काळाची गरज असल्याचे संबोधिले, प्रसंगी लुंबीनी बुध्दविहार समिती चे सिद्धार्थ भांगे, चरणदास वानखडे व प्रशांत अधव उपस्थित होते.
कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता दिनेश वासनिक, दिलीप रामटेके, महेश वासनीक, प्रशांत दिवे, रविंद्र हुमने, हरिभाऊ मडावी, सुमित वासनिक, सुरज बहादुरे, पाखरे, शैलेश हरडे, अस्मित मुनी, भूपेश वानखेडे, मायाताई मेश्राम, माटेताई, धम्मा बहादुरे, हिरालाल मडावी, धनराज वासनिक, नरेश गोंडाणे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला परिसरातील उपासक व उपासीका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन कु.तनाषा अधव तर आभार प्रदर्शन शंकर वासनिक यांनी केले.