- धडाडा पडे पाऊस
- जणूं झाली ढगफुटी
- काळ्याभोर ढगावर
- कोण मारतो काठी
रेअडेलतट्टू धोरण
का धरतो सर्वां वेठी
ढगा मागूनि ढगांची
कसली झाली दाटी
संकटांचा ससेमिरा
का बळीराजा पाठी
पुनश्च हाती कटोरा
विनंत्या मदतीसाठी
हातावर ज्यांचे पोटे
झोपले उपाशीपोटी
इवली चिमणीबाळे
न हुंकार येई ओठी
नाकरमाने हबकले
नोकरी स्थळ गाठी
लक्ष नसे त्यांचेकडे
उपहास तो ललाटी
दम जरासा पावसा
स्वभाव सोड रे हट्टी
दमला असशील बा
घ्यावी अल्पशी सुट्टी
-हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996..
www.kavyakusum.com
Users Today : 1