रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी हिवरखेड येथील डॉक्टर शर्मा यांचे हेल्थकेअर युनिट यांचे तर्फे दिनांक 8 जानेवारी 2023 पासून प्रत्येक पुष्प नक्षत्राच्या दिवशी 6 महिन्याच्या बाळापासून तर वयाच्या 18 वर्षापर्यंत च्या सर्व मुलांना व मुलींना सुवर्ण प्राशन देण्याकरिता शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
डॉक्टर संजय शर्मा यांनी सुवर्ण प्राशन बाबतीत सांगितले की , सुवर्ण प्राशन ही एक अति प्राचीन आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती असून यात बालकाची व्याधी प्रतिकारक्षमता , बुद्धी, स्मृती, एकाग्रता, वर्ण व पचन , आयुष्य वर्धनासाठी सुवर्ण भस्म व इतर वनस्पती पासून तयार केलेले औषध तोंडाद्वारे देण्यात येते. सुवर्ण प्राशन केल्याने आपल्याला भरपूर फायदे मिळतात तरी वरील वयोगटातील सर्व बालकांनी, पाल्यांनी सदरहू सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर संजय शर्मा व
डॉक्टर मोनाली शर्मा यांनी केले आहे.
Users Today : 33