रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी तालुका कृषी अधिकारी कार्यालय तेल्हारा अंतर्गत मौजे जस्तगाव येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत हरबरा अंतर्गत हरभरा पिकाची शेती शाळा तालुका कृषि अधिकारी तेल्हारा नरेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शाखाली घेण्यात आली. हरभरा पिकाचे निरीक्षण घेऊन पिकावर आढळणाऱ्या किडी यांची ओळख प्रत्यक्ष क्षेत्रावर करण्यात आली.तसेच पिकाचे नियमित सर्वेक्षण कसे घ्यावे याबाबत प्रात्यक्षिकासह शेतकऱ्यांना प्रशांत ढोलेकर कृषी पर्यवेक्षक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आज रोजी हरभरा पीक 40 ते 45 दिवसाच्या झाले असून हरभरा पिकाला फुल लागण्याची अवस्थेमध्ये आहे.तरी हरभरा पिकाचे ढगाळ वातावरण यापासून कीड व रोग पासून संरक्षण करण्याकरता बुरशीनाशक तसेच गरजेनुसार कीड नाशक फवारणी करावी.तसेच एकरी 4 ते 5 कामगंध सापळे लावावे जेणेकरून आपल्याला आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर उपाय योजना करता येतील असे आवाहन कृषी सहायक जस्तगाव केशव सरनाईक यांनी केले. समूह सहायक गोपाल लादे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाकरिता जस्तगाव येथील अमोल जवंजाळ, अनिल जवंजाळ, बाबुराव जवंजाळ, गोपाल जवंजाळ,आकाश भिवटे,प्रमोद ज्ञानेश्वर जवंजाळ राम रतन जवंजाळ सोपान जवंजाळ प्रकाश खर्चे विकास जवंजाळ बाबुराव खर्चे भास्करराव गावंडे बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
Users Today : 33