रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येत असणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये हिवरखेड येथील सेंट पॉल अकॅडमीचे पाच विद्यार्थी हे राष्ट्रीय स्तरावर (ग्रामीण) या विभागांमध्ये यांची निवड झालेली असून दहा विद्यार्थीची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. इयत्ता आठवीची विद्यार्थिनी श्रेया कैलास पोके ही जिल्हास्तरावर प्रथम आली असून या विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्तरावर स्कॉलरशिप या परीक्षेमध्ये निवड झाली आहे. तसेच इयत्ता आठवी मधून शरवरी गुप्ता,दिया निंबोकार,सात्विक भोपळे व रुद्र शेगोकार यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली आहे तसेच जिल्हास्तरावर श्री भोंडे, समर्थ राऊत,सृष्टी बांगर,प्रेम अंबुस्कर, दिया भोपळे, परी गावंडे, महेश इंगळे, प्राची इंगळे, नंदिनी हिवराळे, स्वराज कराडे इयत्ता पाचवी मधून जिल्हास्तरावर वीर जयस्वाल, जयेश गायगोड आणि वेदांत सेवक यांची निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये स्कॉलरशिप क्लास घेण्यात आलेले होते विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत तिवारी सर व आपल्या शिक्षकांना आणि पालकांना दिलेले आहे. या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रा. नवनीतजी लlखोटिया सर, लुणकरणजी डागा सर तसेच संस्थेचे सचिव श्री. प्रमोदजी चांडक सर यांनी अभिनंदन केले आहे.
Users Today : 33