औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद,महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम मराठवाडा प्रादेशिक विभाग द्वारे पाचवे जेष्ठ नागरिक राज्यस्तरीय महिला अधिवेशन १९व२०मार्च,२०२३ रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे, याची पूर्व तयारी म्हणून औरंगाबाद येथे गीता भवन मध्ये शुक्रवार(ता,०६)रोजी औरंगाबाद, जालना,नांदेड
हिंगोली येथील जेष्ठ नागरिक महिला व पुरुषांची नियोजन बैठक प्रगतिशील जेष्ठ नागरीक सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष भरत कुमार कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली, याप्रसंगी मराठवाडा संघाचे नांदेड चे अध्यक्ष अशोक तेरकर, सचिव जयवंत सोमवाड, महिला आघाडी प्रमुख डॉ,निर्मला कोरे, व औरंगाबाद जेष्ठ नागरिक संघ सचिव श्रीकांत पत्की ,सेवा निवृत्त आयुक्त कल्याण गवळी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती, प्रास्ताविक महिला
अधिवेशन आयोजिका डॉ,सौ,निर्मला कोरे यांनी केले,व महिला अधिवेशनात घेण्यात येणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरण साठी विविध स्पर्धा ,कला,कौशल्य ,याबाबत माहिती दिली,अशोक तेरकर यांनी जेष्ठ नागरीक संघ जास्तीत जास्त उघडून जेष्ठां च्या मागण्या शासनाकडून मान्य करून घ्याव्या यावर भर दिला, या प्रसंगी वैजापूर वैजीनाथ जेष्ठ नागरिक सेवा संघाचे सचिव धोंडीरामसिंह राजपूत यांनी मनोगत व्यक्त करून महिला अधिवेशनात यशस्वी करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे आवाहन केले, आचार्यजी,श्री ,कंकाल जालना, हरिभाऊ मुळे, यांनी मनोगत व्यक्त केले,वैजापूर चे अशोक धसे,उत्तमराव साळुंके,साहेबराव साळुंके,अशोक आप्पा पवार, यांनी सहभाग नोंदविला,श्रीमती चित्रा पिलखाने, सूर्यकांत कुलकर्णी विभा श्रीवास्तव, रेणू मूळे, प्रेमचंद तुल्ले यांनी सहकार्य केले,सूत्र संचलन श्रीकांत पत्की यानी केले,
Users Today : 35