सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील व सावळदबारा परिसरातील आपल्या लेखणीतून समाज जागृतीचे मौलिक कार्य करणारे, समाजाला आरसा दाखविणारे, प्रसंगी रोष पत्करून सत्य समोर आणण्याचे धाडस करणारे, लोकशाहीचा चौथा स्तंभ जीवंत ठेवण्यासाठी पत्रकार आणि पत्रकारितेचे मोठे योगदान असून पत्रकारिताने समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे असा शब्दात फर्दापूरचे पोलिस सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी पत्रकार बांधवांचा फर्दापूर येथे गौरव करुन सत्कार करण्यात आला. फर्दापूर पोलिस ठाण्यात आयोजित दर्पण दिन व पत्रकार बांधवांच्या सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी मराठी पत्रकारितेचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे सपोनि देवीदास वाघमोडे यांनी पुजन करुन विनम्र अभिवादन केले.याप्रंसगी साप्ताहिक आपले ज्ञानपंख व न्यूज संपादक मा.श्री. दशरथ सुरडकर पुढे बोलताना म्हणाले की, ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण सुरू करून बाळशास्त्री जांभेकर यांनी तत्कालीन इंग्रज राजवटी विरोधात भारतातील जनसामान्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला होता आजही समाज भावना मांडण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून केले जात असून पत्रकारितेला समाज मनाचा आरसा वाटल्यास वावगे ठरणार नाही.यावेळी सपोनि देवीदास वाघमोडे, उपनिरीक्षक व पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी व सोयगाव,बनोटी, फर्दापूर,सावळदबारा,घाणेगांव तांडा अशे परिसरातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 35