नागपूर – महाराष्ट्र राज्य शहर व ग्रामीण पत्रकार संघातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी २०२३ करिता विविध क्षेत्रातून पुरस्कारांकरिता महाराष्ट्र व विदर्भ स्तरावर पत्रकारिता क्षेत्रातून वृत्तपत्रातील संपादक, उत्कृष्ट पत्रकार, वृत्तपत्र छायाचित्रकार, जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, वार्ताहर इत्यादी कलाक्षेत्रातून उत्कृष्ट गायक, नाटककार, बाल कलाकार, नृत्यकार, भजनकार, लोकसंगीत, लावणी, प्रवचनकार, कीर्तनकार, तबलावादक, ऑक्रेस्ट्रा ग्रुप, कलामंच इत्यादी, शैक्षणिक क्षेत्रातून प्राचार्य, मुख्याध्यापक मुख्याध्यापिका, आदर्श शिक्षक-शिक्षिका इत्यादी, सामाजिक क्षेत्रातून जनहितार्थ आंदोलनकारक, महिला-पुरुष बचत गट, सामाजिक संस्था, समाजसेवक, जनसेवक, कोविड – १९ योद्धा व तसेच क्रिडा क्षेत्रातून महिला-पुरुष धावक, कबड्डी, खो-खो, क्रिकेट, इत्यादीकरीता प्रस्ताव अर्ज आमंत्रित आहे.
पत्रकार संघाचे संस्थापक-अध्यक्ष राजेश
एन. ठाकूर यांनी सांगितले की, उपरोक्त विविध क्षेत्रातून पुरस्कार वितरण स्पर्धकांसाठी दोन समूहात घेतल्या जातील. त्यात महाराष्ट्र स्तर व विदर्भस्तर दोन समूह वेगवेगळे राहतील. या स्पर्धेत पत्रकारिता क्षेत्रातून वृत्त संपादन, खोजवाती, विकास वार्ताी, क्रिडावाती, व्यापार वाती, रोजगार वाती इत्यादिंकरिता ‘महाराष्ट्र पत्रकार मित्र’, ‘महाराष्ट्र पत्रकार भूषण’, ‘महाराष्ट्र पत्रकार – रत्न’, ‘महाराष्ट्र दर्पण गौरव’, ‘भारत ज्योती गौरव’ व तसेच ‘उत्कृष्ट पत्रकार’ म्हणून निवड करण्यात येईल. सामाजिक, कलाक्षेत्र व क्रिडा क्षेत्रातून ही महाराष्ट्र व विदर्भ स्तरावर विविध पुरस्कारांकरिता निवड करण्यात येईल. या स्पर्धेत पुरस्काराचे स्वरूप म्हणून पत्रकार संघटनेकडून शाल, श्रीफळ, मानचिन्ह व गौरव प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धकांनी प्रस्ताव अर्ज पाठविताना मागील दोन वर्षाच्या विविध संघटनेकडून प्राप्त प्रमाणपत्राची छायांकित प्रत व तसेच वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झालेल्या कात्रणाची छायांकित प्रत सह १२ प्रती पासपोर्ट फोटो प्रस्ताव अजीसह पोस्टाद्वारे त्वरित पाठवावे. प्रत्येक छायांकित प्रत साक्षांकित सत्यप्रत करून पाठवावी. स्पर्धकांनी दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंत, पत्ता राजेश एन. ठाकूर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शहर व ग्रामीण – पत्रकार संघ, मुख्य कार्यालय, ‘विशाखा निवास’, अजयनगर, अंबाझरी हिल टॉप, नागपूर ४४००३३ येथे स्पर्धकांनी प्रस्ताव अर्ज त्वरित रजिस्टर पोस्ट / स्पीड – पोस्टाद्वारे पाठवावे. अधिक माहितीसाठी मो. क्र. ९३७३२१३६२४ वर संपर्क करावे.