जिल्हाधिकारी यांच्याद्वारे मुख्यमंत्र्यांकडे “सं.सु.के.भो.सांस्कृतिक परिषदेची निवेदनाद्वारे मागणी वाशिम प्रतिनिधी ; आधुनिक मराठी रंगभूमीचे शिल्पकार संगीत सूर्य केशवराव भोसले यांना अवघ्या 31 वर्षाचा आयुष्य लाभलं त्यांच्या कारकीर्दीत मराठी रंगभूमीला पहिल्यांदा मखमली पडदा दिला तत्कालीन परिस्थितीत महिलांना एवढा वाव नव्हता अशावेळी हिराबाई पेंडणेकर सारख्या महिला नाटककरांना पुढे आणून पहिली महिला नाटककार म्हणून सन्मान प्राप्त करून दिला एवढेच नाही तर स्वातंत्र्य लढ्यात, सामाजिक क्षेत्रात, नाट्य क्षेत्रात अजरामर कार्य कर्तुत्व केले आहे. पण दुर्दैवाने अशा कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वाचा विसर पडलेला आहे. मराठा सेवा संघाचा कक्ष संगीत सूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद यांनी केशवराव चा जीवनमान समाजासमोर मांडत नाट्य व सामाजिक क्षेत्रात कार्यकर्तृत्व उमटवल्याचा दाखला देतात. अडगळीत पडलेल्या महानुभावांचा परिचय करून त्यांच्या कार्य कुशलतेला उजाळा देत आहेत. संगीत सूर्य केशवराव भोसले हे आधुनिक मराठी रंगभूमीची शिल्पकार व व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत त्यांचे नाव सांस्कृतिक कार्य संचालनालय द्वारा प्रसिद्ध होत असलेल्या महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे त्याकरिता सन्माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी वाशिम यांचे मार्फत मराठा सेवा संघ प्रणित संगीत सूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद वाशिम जिल्हा यांचे वतीने निवेदन देण्यात आले यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काळबांडे, महासचिव प्रशांत देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे, बांडे सर, सांस्कृतिक परिषदेचे जिल्हाध्यक्ष लोकशाहीर शाम वानखडे, जिल्हा सचिव गोपाल खाडे, कार्याध्यक्ष दशरथ खडसे, पाचरणे सर, सोशल मीडिया प्रमुख नितीन जोगदंड, प्रदीप पट्टेबहादूर आदींसह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, सांस्कृतिक परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 25