वाशिम प्रतिनिधी – वाशिम ; ग्राम सनगाव येथील सुनील विठ्ठल भगत वय २८ वर्ष युवक रा. सनगाव तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम येथील रहिवासी असून तो दिनांक २२/१२/२०२२ पासून दुपारी ३ वाजताच्या सुमारास घरून निघून गेला. घरच्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार तो मुंबईला नाशिकला जातो असे २ ते ३ दिवसापासून सांगत होता.त्याच्या अंगात पांढऱ्या कलरचे शर्ट, कथ्या कलरची पॅन्ट, व गळ्यात पांढरा शेला व पायात काळी तारा चप्पल आहे. याची उंची 5 फूट इतकी असून रंग सावळा उजव्या डोळ्याला डोईवरती जखम सारखी खून आहे. *अल्प बुद्धी मतिमंद* तो असून नेहमी घरून निघून जात असे आणि ३,४ दिवसांनी परत घरी येत होता. किंवा नातेवाईकांच्या घरी गेल्याचं फोन करून सांगत होतो. त्याला कुठल्याही प्रकारचे लिहिता वाचता येत नाही. पण पूर्ण पत्ता सांगता येतो. तो यावेळेस गेला व घरी परत आला नाही. मुंबई नाशिक जातो म्हणून सांगत होता, कोठे गेला हे मात्र माहित नाही. परंतु गेला तर अजून घरी परतला नाही. या संदर्भात सविस्तर माहिती ही आसेगाव पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्वारे दिली आहे. पुढील तपास हे आसेगाव (मंगरूळपीर) पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात येत आहे. तरी आपणास व आपल्या परिसरात आढळल्यास त्यांचे नातेवाईक यांच्या या मो.क्र. 96 99 90 24 74 या नंबर वरती संपर्क साधावा. अशी विनंती त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
Users Today : 25