केकतउमरा येथे सावित्री बाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

Khozmaster
1 Min Read

वाशिम प्रतिनिधी – नेहरू युवा मंडळ व राजा प्रसेनजित संस्था केकतउमरा यांचा पुढाकार  वाशिम येतून जवळच असलेल्या ग्राम केकत उमरा येथे नेहरू युवा बहुद्देशीय मंडळ व राजा प्रसेनजीत अल्पसंख्यक शिक्षण संस्था केकतउमरा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्येची आराध्य देवता माता सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी उपस्थित बौध्द्ाचार्य अशोक भिक्काजी पट्टेबहादुर , युवा सामाजिक कार्यकर्ते तथा स्वच्छ भारत पुरस्कार प्राप्त माजी राष्ट्रीय युवा कोर व (नेयुबम)अध्यक्ष प्रदीप पट्टेबहादुर, गौतम पट्टेबहादुर, पिंटू पट्टेबहादुर, नीलिमा पट्टेबहादुर, रेखा पट्टेबहादुर, दिपाली किशोर पट्टेबहादूर ,मंगेश पट्टेबहादुर, व विद्यार्थी जन उपस्थित होते.यावेळी अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सामाजिक शैक्षणिक जीवनात आपले मनोगत विचार मांडले व उपस्थितांनी आपले विचार व्यक्त केले.याच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहीली पडघाण यांनी केले तर. प्रास्ताविक चैताली वैद्य यांनी केले. आभार प्रदर्शन सुहानी पट्टेबहादुर यांनी मानले या वेळी अशोक पट्टेबहादुर,प्रदिप पट्टेबहादुर,मंगेश पट्टेबहादुर,शुभम पट्टेबहादुर, नीलिमा पट्टेबहादुर,शांताबाई पट्टेबहादुर,रेखा पट्टेबहादुर, दिपाली किशोर पट्टेबहादुर, जयश्री पट्टेबहादुर,दीक्षा सि. पट्टेबहादुर,व नेहरू युवा मंडलाच्या सदस्य सुहानी पट्टेबहादुर,अंजली पट्टेबहादुर, पुनम पट्टेबहादुर यांच्या सह आधी विद्यार्थी महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यकर्माचे आयोजन नेहरू युवा मंडळ व राजा प्रसेनजीत संस्था केकतउमरा यांच्या वतीने करण्यात आले होते.

 

0 9 3 7 1 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *