ते ४ दिवसापासून जिल्ह्याला थंडीचा तडाका

Khozmaster
1 Min Read

वाशिम ; परिसरातील ३ जानेवारी पासून सतत थंडीचा तडाका हा जिल्ह्याला भासत आहे. यामध्ये सकाळ सकाळी खूप धोक्याचे वातावरण पाहावयास येत आहे. आकाशात जमलेल्या ढगांच्या दाटीमुळे दिवसाच्या कमाल तापमानात अचानक मोठी घसरण झाल्याचे आढळले आहे. बुधवारी 4 जानेवारी सकाळपासून आकाश ढगांनी घेराव घातला होता. वाशिम जिल्हा सह ग्रामीण भागाला या धुक्याने आपल्या धुक्याची चादर पसरली होती. दिवसाचा पारा 24 तासांत 4.4 अंशांनी आणि सरासरीपेक्षा 6.5 अंशांनी खाली घसरला. त्यामुळे दिवसभर हुडहुडी भरली भरल्यासारखे होत आहे. दिवसाचे तापमान घसरले; पण रात्रीच्या पाऱ्याने 5.2 अंशांची मोठी उसळी घेतली आहे. सात तारखेला सकाळी शनिवारच्या पहाटे वाशिम जिल्ह्यासह तालुक्यातील तोंडगाव सर्कल केकतउमरा परिसरातील धुक्याने आपली चादर ही पूर्ण शुभ्रतेची पीसारली होती. शेतकऱ्याच्या शेतामध्ये असलेले तुर, गहू, हरभरा, या सह भाजीपाला अन्य इतरत्र पिकांवर याचा प्रादुर्भाव होत असून याचा फटका हा या पिकाला शेतकऱ्याला बसणार असल्याचे चित्र निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. तर या थंड दमट वातावरणामुळे सर्दी, ताप,खोकला, घास या रोगांचा प्रादुर्भाव देखील वाढत असल्या मुळे रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

0 9 3 7 1 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *