नालासोपारातील सेन्ट्रल पार्क, जिजाई नगर, मोरेगाव मधिल विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची_शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब_ठाकरे यांचे विचार तसेच वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद_दिघे साहेब यांची प्रेरणा घेऊन बाळासाहेबांची शिवसेना पक्ष मार्गक्रमण करत आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलेली विविध लोकोपयोगी विकासकामे तसेच सर्व स्तरातील घटकांकरिता घेतलेले निर्णय ध्यानात घेऊन अनेकजण पक्षात प्रवेश करत आहेत. नालासोपारात शहरात कायमच शिवसेनेचा विचार बळकट करण्याचे काम केले आहे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून सामील होणाऱ्या कार्यकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरवू, तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून वसई तालुक्यातील प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासित करून या सर्वांचे पक्षात स्वागत केले तसेच त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर साहेब, तालुकाप्रमुख सुदेश चौधरी साहेब, उपतालुकाप्रमुख अजित भाऊ खांबे, शहरप्रमुख सुभाष सावंत, तसेच उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 16