तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा, येथील राष्ट्रीय सेवा योजना द्वारे आयोजित निवासी विशेष शिबिर तालुक्यातील दत्तक ग्राम खल्याळ गव्हाण येथे दिनांक 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खल्याळ गव्हाण येथे पार पडले.
या शिबिरा दरम्यान सामाजिक जागृती व्हावी या उद्देशाने विविध उपक्रम राबण्यात आले. त्यामध्ये ग्राम स्वच्छता रॅली, शेतकरी आत्महत्या, मतदान जनजागृती, महिला सक्षमीकरण, वेसण मुक्ती अश्या विषयावर पथनाट्य सादर करून सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न स्वयंसेवकांकडून करण्यात आला. तसेच शिबिरा दरम्यान विविध बौद्धिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामध्ये हायटेक शेती या विषयावर पुंजजी भुतेकर, कृषी योजनांचा प्रभावी उपयोग श्री. गणेश सावंत, आजच्या युवकांचा समाजाप्रती दृष्टीकोन पत्रकार सुरज गुप्ता, युवकांचा रा. से.यो. मधील सहभाग डॉ.महेंद्र साळवे, बिजोप्तदान तंत्रज्ञान प्रा. लिकेश मेश्राम, स्त्रियांच्या समस्या व उपाययोजना सखोल चर्चा, प्रा. श्वेता धांडे, शेळीपालन एक यशस्वी उद्योग श्री अज्जिज खान, लम्पि रोग निदान व मार्गदर्शन डॉ. संदीप उदार अशा विविध विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच शिबिरार्थीचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दि.7-01-2023 ला रक्त दान व जनावरांना लम्पि या आजाराचे लसीकरण करून शिबिराचे समारोप कारण्यात आला या प्रसंगी, कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोजभाऊ कायंदे,प्रमुख उपस्तीत सौ कविता बद्रीनाथ दंदाले सरपंच खल्याळ गव्हाण , शितल विनोद खंडागळे उपसरपंच, श्री. शिवाजी डोईफोडे ग्रा. सदस्य, श्री रामदास दंदाले अध्यक्ष शाळा सुधार समिती डॉ. नितीन मेहेत्रे प्राचार्य समर्थ कृषी महाविद्यालय दे. राजा यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पुनज व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात केली, जि प सदस्य मनोज कायंदे यांनी उपस्तितांना संबोधित करतांना रासेयो चे विद्यार्थी जीवनातील महत्त्व सांगितले . कविता बद्रीनाथ दंदाले यांनी स्वयंसेवकाचे त्यांनी केलेल्या संपूर्ण कामाची पोचपावती देतांना कौतुक केले, श्री. रामदास दंदाले यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे यांनी विद्यार्थी जीवनातील आपले रासेयो मधील अनुभव स्वयंसेवकांना सांगितले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. शुभम काकड यांनी केले , सूत्रसंचालन धनेश टाकवले व आभार प्रदर्शन प्रियांका कदम यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. सह कार्यक्रम अधिकारी प्रा. लिकेश मेश्राम, प्रा. विलास सातपुते, प्रा. श्वेता धांडे व रा. से. यो.स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.