मेहकर:- (विशेष प्रतिनिधी)
मेहकर शहरातील भाजीपाला मार्केट तसेच ठिकठिकाणी रस्त्यांवर असलेले फळांचे हातगाडे त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी असलेले खाऊन चे विविध हात गाड़ी हा संपूर्ण बाजार जानेफळ रोडवरील भास्करराव गारोळे यांच्या आरा मशीन समोरील खुल्या पटांगणात नेण्याची चर्चा मेहकर शहरात दोन-तीन दिवसांपासून सुरु होती यामध्ये मेहकर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या संकल्पनेतून मेहकर शहरामध्ये नगरपालिकेने बांधलेल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भाजी मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरलेले असून तसेच काही भाजीपालेवाल्यांची दुकाने ही जानेफळ चौकातील शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला भर सत्यावर असल्यामुळे अपघाताची शक्यता गृहीत धरुन मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी मेहकर शहरातील रस्त्यावर असलेले फळांचे दुकाने तसेच भाजीपाला विक्रेत्यांची दुकाने त्याचप्रमाणे लहान मुलांच्या खाऊंची दुकाने ही सर्व दुकाने एकत्रित रित्या एकाच ठिकाणी हलवण्यात येऊन मेहकर शहरातील नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व जीवन उपयोगी वस्तु उपल करुन देण्याची संकल्पना होती मात्र या गोष्टीस मेहकर शहरातील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला त्या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी व्यापारी असोसिएशनथ्या विविध आघाड्यांचे अध्यक्षांनी माजी नगराध्यक्ष विलास चनखोरे तसेच माजी उपाध्यक्ष जयचंद नाटिया यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्याशी मेहकर नगरपालिकेच्या सभागृहामध्ये साधक वादक चर्चा करुन चर्चेअंती मेहकर शहरातील भाजीपाला मार्केट तसेच इतरही फळांच्या गाठ्या तसेच खाऊ विक्रेत्यांच्या गाड्या या सर्व सद्यस्थितीत आहे अशाच ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला यावेळी या बैठकीत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश मुंदडा, माजी नगरसेवक रवी सावजी, दिवाकर मेहकरकर, माजी नगरसेवक पती समाधान सास्ते, माजी नगरसेवक तौफिक कुरेशी, बोबराजी, ठेकीया, विनोद सदावर्ते व विविध व्यापाऱ्यांसह पत्रकार नारायण पचेरवाल, नगर परिषदचे अजय चैताने, संजय गिरी, संतोष राणे, उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष विलास चनखारे यांनी मेहकर शहरातील संपूर्ण परिस्थिती मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या निदर्शनास आणून देत सदर भाजीपाला मार्केट तसेच इतर फ्रूट व खाऊ विक्रेत्यांच्या गाड्या शहराच्या बाहेर नेल्यास त्यामध्ये शहरातील नागरिकांना विनाकारण त्रास होऊन शहरातील व्यापाऱ्यांचे सुद्धा नुकसान होण्याची शक्यता बोलून दाखवली आणि आणि उपस्थित संपूर्ण व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी त्यांना संमती दर्शवल्याने अखेरीस शहरातील भाजी मार्केट आहे त्याच ठिकाणी ठेवण्याचा निर्णय मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी घेतल्याने माजी नगराध्यक्ष विलासराव चनखोरे यांनी यशस्वी मध्यस्थी करुन मेहकर शहरातील व्यापाऱ्यांना न्याय दिल्याची चर्चा संपूर्ण मेहकर शहरात रंगत असून मेहकर शहरातील व्यापाऱ्यांनी माजी नगराध्यक्ष विलास चनखोरे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
अखेर मेहकर शहरातील बाजारपेठ मेहकर शहरातच राहणार माजी नगराध्यक्ष विलासराव चनखोरे यांची मध्यस्थी यशस्वी

0
6
6
8
6
6

Leave a comment