वाशिम प्रतिनिधी राजा प्रसेनजित संस्था व विद्यार्थी भरती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पट्टेबहादुर व मित्र मंडळ यांचा पुढाकार प्रसिद्ध विद्रोही लोकशाहीर शाहीर संभाजी दादा भगत हे दि.७ जानेवारी रोजी वाशीम येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शाळा बचाव समिती परिषदेच्या कार्यक्रमाप्रसंगी वाशिम येथे ते आले होते. यावेळी त्यांची विद्यार्थी भारती संघटना वाशिम व राजा प्रसेनजित अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्था केकतउमरा व मित्र मंडळ यांच्यावतीने सुप्रसिद्ध लोककवी विद्रोही शाहीर संभाजी दादा भगत यांचे पुष्पगुच्छ व महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन चरित्र पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत केले.यावेळी उपस्थित युवा सामाजिक कार्यकर्ते अक्षय नवघरे , विद्यार्थी भारती संघटना जिल्हाध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते माजी राष्ट्रीय युवा कोर स्वच्छ भारत पुरस्कार प्राप्त प्रदिप पट्टेबहादुर, युवा सामाजिक कार्यकर्ते cpi सदस्य सदानंद पट्टेबहादूर, जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त भगवान ढोले, युवा प्रोफेशनल सोशल वर्कर सोमीनाथ मुकाडे, पंकज खडसे, संदीप कांबळे, अविनाश उचित यांची उपस्थिती होती. त्यांच्याशी संवाद साधताना म्हणाले की दिन दुबळ्या व गरजू गोरगरिबांच्या मुलांसाठी जिल्हा परिषद प्राथमिक ह्या सरकारी शाळा असणे खूप गरजेचे आहे. पटसंख्येवरून शासनाने घेतला.निर्णय हा अतिशय चुकीचा असून गोरगरिबाच्या मुलांनी व खेड्यापाड्याच्या मुलांनी शाळा बंद केल्यावर शिक्षण घेण्याकरिता जायचे कुठे. हा प्रश्न मात्र खूप भयंकर वेठी वरती येणार आहे. हा अतिशय चुकीचा निर्णय असून याकरिता तरुण युवक, आई – वडील इतर सामाजिक संस्था संघटनांनी पेटून उठले पाहिजे. शासनाने घेतलेला हा निर्णय मागे घ्यावा याकरिता वैचारिक रीतीने संघर्ष पुकारला पाहिजे. अशी मत यावेळी शाहीर संभाजी दादा भगत यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित अक्षय नवघरे, प्रदिप पट्टेबहादूर, सदानंद पट्टेबहादूर भगवान ढोले, सोमनाथ मुकाडे, संदीप कांबळे, पंकज खडसे, अविनाश उचित व विद्यार्थी भारती संघटना व राजा प्रसेनजीत संस्थेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
Users Today : 25