वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर ; जागर संविधानाचा’ व्याख्यानमाला पुष्प ११ संपन्न” संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित व प्रभू श्री रामचंद्र शिक्षण प्रसारक मंडळ तोंडगाव द्वारा संचलित मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधानावर प्रकाश टाकण्यासाठी ‘जागर संविधानाचा’ या व्याख्यानमालेचा कार्यक्रम *दि.26 नोव्हेंबर 2022 ते 26 जानेवारी 2023* या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने आयोजित केला आहे. दर आठवड्यातील शनिवार व रविवार या दिवशी *भारतीय संविधानातील 22 भागातील एका एका भागावर मार्गदर्शन होणार आहे आहे. या व्याख्यानमालेचे अकरावे पुष्प दिनांक 07 जानेवारी 2023 रोजी प्रा.डॉ.विठ्ठल जाधव , लोकप्रशासन विभाग प्रमुख, कालिका देवी महाविद्यालय, शिरूर (कासार) जि.बीड तथा सदस्य, लोकप्रशासन अभ्यास मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी गुफंले. अकराव्या पुष्पा मध्ये भारतीय संविधानातील भाग तेरावा व चौदावा – संघराज्य आणि राज्य यांचे नियंत्रणाखाली असलेल्या सेवा या भागांवर प्रकाश टाकला. भारतीय संविधानाची प्रत्येक नागरिकाला ओळख असणे क्रम प्राप्त आहे कारण भारतीय नागरिकत्वाच्या प्रशिक्षणाचा पाया भारतीय संविधानाने घातला आहे. भारतीय संविधान हे या दृष्टीने जगात सर्वश्रेष्ठ आहे. भारतीय संविधानामध्ये भाग 13 या अंतर्गत कलम 300 ते 307 मध्ये भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंधी तरतुदी करण्यात आले आहेत तर भाग 14 मध्ये संघराज्य आणि राज्य यांचे नियंत्रणाखालील असलेले सेवा याविषयी तरतूद आहे. भारतीय संविधानाने संघराज्य व राज्य यांचे सेवेत असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या नोकरीचे पूर्ण संरक्षण दिले आहे परंतु त्याचबरोबर प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाची प्रामाणिकपणे व काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक. असे मत मांडत असताना त्यांनी भारतीय संविधानातील असलेल्या वेगवेगळ्या सेवा विषयक कलमावर सविस्तर असे मार्गदर्शन डॉ. जाधव यांनी व्यक्त केले. सदर व्याख्यानमालेच्या सत्रासाठी अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. बी आर तनपुरे , इतिहास विभाग प्रमुख, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय वाशिम हे उपस्थित होते.सदर व्याख्यानमालेचे प्रास्ताविक , आभार प्रदर्शन आयोजक प्रा.डॉ.विलास गायकवाड यांनी केले. सदर व्याख्यानाला महाराष्ट्रातील संविधानाचे अभ्यासक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 25