औरंगाबाद -प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत मुख्यमंत्रयाच्या हस्ते पुरस्कार सोहळा……सिल्लोड तालुक्यातील पत्रकार सदाशिव फुले यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून सातत्याने लिखाण करून अनेक सामाजिक प्रश्नांना मार्गी लावले आहेत.पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे अप्रतिम मीडियाच्या वतीने बिट जर्णालीझम साठी दिल्या जाणाऱ्या चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार सदाशिव फुले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी एमएसआरडीसी चे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक श्री राधेश्याम मोपलवार, अतिरिक्त मुख्य सचिव श्री नंदकुमार,मंत्रालय वार्ताहर विधिमंडळ संघाचे अध्यक्ष श्री मंदार पारकर,अप्रतिम मीडियाचे संचालक डॉ. अनिल फळे, विठ्ठल साखर कारखान्याचे प्रवर्तक श्री अभिजीत पाटील, अभिनेते श्री मंगेश देसाई, निमंत्रक श्री विवेक देशपांडे व रणजीत कक्कड यांच्या प्रमुख उपस्थित यशवंत्तराव चव्हाण सेंटर मुंबई येथे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता हा सोहळा पार पडला.गेल्या पाच वर्षातील पत्रकारितेतील सदाशिव फुले यांनी शेतकऱ्यांविषयी चांगल्या प्रकारे लिखाण केले आहे. प्रगतीशिल शेतकऱ्यांच्या यशोगाथा पोखरा योजनेसंदर्भात आदिअडचणी विषयी त्यांनी चांगल्या प्रकारे लिखाण केलयाने अप्रतिम मीडियामार्फत दिला जाणारा कृषी वृत्त गटातून राज्यस्तरीय पुरस्कार सदाशिव फुले यांना देण्यात आला. मुंबई -चौथ्या स्तंभाचा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सदाशिव फुले यांना प्रदान करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,एमएसआरडीसी कार्यकारी संचालक, राधेश्याम मोपलवार, अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार,आयोजक डॉ. अनिल फळे आदी.
Users Today : 33