लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारितेने ख-या अर्थाने समाजाला दिशा देण्याचे काम केले

Khozmaster
2 Min Read

कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे सोयगाव तालुका गोकुळसिंग राजपुत सोयगाव तालुक्यातील व सिल्लोड येथील व सावळदबारा परिसरातील आपल्या लेखणीतून समाज जागृतीचे मौलिक कार्य करणारे, समाजाला आरसा दाखविणारे, प्रसंगी रोष पत्करून सत्य समोर आणण्याचे धाडस करणारे, लोकशाहीचा चौथा स्तंभ जीवंत ठेवण्यासाठी पत्रकार आणि पत्रकारितेचे मोठे योगदान असून पत्रकारितेने समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे असा शब्दात फर्दापूर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी पत्रकार बांधवांचा फर्दापूर येथे गौरव करुन सत्कार करण्यात आला.फर्दापूर पोलिस ठाण्यात आयोजित दर्पण दिन व पत्रकार बांधवांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमा प्रसंगी मराठी पत्रकारितेचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे सपोनि देवीदास वाघमोडे यांनी पुजन करुन विनम्र अभिवादन केले.याप्रंसगी यांनी आपले विचार मांडताना पुढे म्हणाले की, ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण वृत्तपत्र सुरू करून बाळशास्त्री जांभेकर यांनी तत्कालीन इंग्रज राजवटी विरोधात भारतातील जनसामान्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला होता. आजही समाज भावना मांडण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून केले जात असून पत्रकारितेला समाज मनाचा आरसा वाटल्यास वावगे ठरणार नाही असे विचार मांडले.साप्ताहिक आपले ज्ञानपंख व ज्ञानपंख-24 NEWS चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांनीही पत्रकारांना शुभेच्छा देतांना आपले विचार मांडले या पत्रकार दिनाला साप्ताहिक आपले ज्ञानपंख वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक प्रविण तायडे, सिल्लोड तालुका प्रतिनिधी संजय दांडगे, पत्रकार बाळू शिंदे,पत्रकार शरद दामोदर, पत्रकार सुनील काळे,पत्रकार गोकुळसिंग राजपुत, पत्रकार ईश्वर इंगळे , पत्रकार संदीप इंगळे, पत्रकार योगेश बोखारे,पत्रकार संतोष गर्दे, पत्रकार दिलीप शिंदे, सागर भुजबळ, गणेश वराडे, योगेश महाकाळ, शेख सादिक, शेख अजहर, अजीम शेख, शिवाजी महाकाळ, अनिल रावळकर ,पत्रकार यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक व पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी व सिल्लोड- सोयगाव,बनोटी, फर्दापूर,सावळदबारा,घाणेगांव तांडा परिसरातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *