औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर देशात आणीबाणी काळात वैजापूरातील आठ व्यक्तींना तुरुंगवास झाला होता,या तुरुंगवास भोगलेल्या आठ व्यक्ती किंवा त्यांच्या वारसांना सरकारने दर महिन्याला मानधन देणे आरंभ केलेले आहे,हे मानधन मिळवून देण्यासाठी वैजापूर चे माजी नगराध्यक्ष डॉ,दिनेश परदेशी व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी कागदपत्रे पूर्तता करणे,शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करणे,असे अथक प्रयत्न केले व या आठही व्यक्तींना शासनाकडून मानधन सुरू करून दिले ,त्यामुळे या आठही व्यक्ती नी सोमवार(ता, ०९)रोजी डॉ,दिनेश परदेशी व धोंडीरामसिंह राजपूत यांचा सत्कार नारायण लाडवानी यांनी केला, डॉ,दिनेश परदेशी यांनी ही या आठही व्यक्तींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला, नारायण लाडवानी,शेख हुसेन,लीलाबाई अनर्थे, सत्यभामाबाई पुणे,सोनुबाई शेलार,रुख्मिनी शिंदे,कमला श्रीवास्तव, यमुनाबाई जाधव यांचा समावेश आहे, या प्रसंगी माजी नगरसेवक दिलीप सिंह राजपूत,भास्कर मतसागर यांची उपस्थिती होती,(फोटो कॅप्शन-डॉ,दिनेश परदेशी व धोंडीरामसिंह राजपूत यांचा सत्कार करतांना नारायण लाडवानी
Users Today : 33