औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत चिमुकल्यांच्या चित्त थरारक प्रात्यक्षिका ने जिंकले प्रेक्षकांचे मनेऔरंगाबाद हर्सूल येथे- कै. तेजराव पाटील निकम बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित रायझिंग स्टार स्कूलचे 15 वे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. बालवर्गापासून ते दहावीपर्यंत च्या विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनात हिरीरीने भाग घेतला होत. विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटके, पोवाडे, लावण्या, व विविध लोकनृत्यवर ठेका धरत आपल्या कलागुणांनी प्रेक्षकांना दात देण्यास भाग पाडले होत. शहीद जवानांना श्रद्धांजली देत या कार्यक्रमाची सर्वात झाली.गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार,व प्रशालेतून सैन्यात भरती झालेल्या जवानाच्या आई वडिलांच्या यथोचित सत्कार करीत,तीन तास झालेल्या या कार्यक्रमांमध्ये चिमुकल्यांनी आपल्या कलागुणांतून देशप्रेम, मातृप्रेम, आणि समाज हित जोपासणारा अमूल्य संदेश देण्याचा सुप्त प्रयत्न केला. स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील, शाळेचे अध्यक्ष सुभाष निकम ,जिल्हा परिषद प्रभारी दिलीप निकम ,शिवव्याख्याते संजय गायकवाड ,भाग्यश्रीताई औताडे, प्राध्यापक जमाले,शिवव्याख्याते प्रदीप जगताप, सरपंच सौ सविताताई निकम,अरुण निकम,संदीप चव्हाण, मुख्याध्यापिका कावेरी निकम, स्वाती निकम ,स्वाती लहाने,प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह हजारो पालकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश मोकसे यांनी केले तर कावेरी निकम यां
Users Today : 33