औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर राज्याच्या ३०जिल्ह्यातील सरकारी खात्यातील तसेच ,जि,प,खात्यातील दीड हजार सेवा निवृत्त आपल्या विविध मागण्यांसाठी नाथांच्या पैठण नगरीत शनीवार ( ता,०७)रोजी एकवटून राज्याचे रोजगार हमी मंत्री ना,संदीपान भुमरे यांना मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून गळ टाकली,केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना दर महा वैद्यकीय भत्ता मिळतो तो राज्यातील कर्मचाऱ्यांना मिळावा, राज्यातील पेंशनर्स वयाच्या८०–८५ वर्ष पेक्षा अधिकचे आहेत त्याचे केंव्हाही बरे वाईट होऊ शकते या साठी सातव्या वेतन आयोगाचे थकीत दोन हप्ते शासनाने तात्काळ द्यावे,सरकारी सेवा निवृत्त कर्मचारी व खाजगी अनुदानित शाळा निवृत्त कर्मचारी यांना जिल्हा कोषागार कार्यालयातून पेंशन मिळते तशी राज्यातील जि,प,च्या सेवानिवृत्त
कर्मचारी यांना ही जिल्हा कोषागार कार्यालयाकडून
दर महिन्याला पेंशन मिळावी,केंद्र प्रमुख एक वेतन वाढ त्वरित अदा करावी,३०जून रोजी सेवा निवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मा,सर्वोच्च न्यायालय आदेशानुसार एक वेतन वाढ तात्काळ मंजूर करावी,अंथरुणावर खिळलेल्या सेवा निवृतांना घरी जाऊन पेंशन द्यावी,वैद्यकीय सेवेचे लाभ सेवा निवृतांना मिळावे या मागण्या मंजूरसाठी राज्यातील पेन्शन नी.ना.भुमरे यांना विनंती, त्यांनी ह्या मागण्या मा.मुख्यमंत्री याच समोर ठेवून मान्य करण्याची विनंती करण्यात येईल असे आश्वासन याप्रसंगी दिले
Users Today : 33