सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील एका युवकांनी प्रेयसीच्या जाचाला कंटाळून केली आत्महत्या

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या प्रेयसीविरुद्ध फर्दापुर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल सोयगाव  तालुक्यातील पळसखेडा येथील एका युवकाने प्रेयसीच्या जाचाला कंटाळून प्रेयसीच्याच राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असल्याचे निदर्शनास आले आहे. सविस्तर माहिती अशी की, सोयगांव तालुक्यातील पळसखेडा येथील मयत रहिवासी भीमराव प्रकाश बोराडे वय 33 वर्षे याचे आणि गावातीलच संगीता उर्फ शर्मिला उस्मान तडवी राहणार पळसखेडा हिच्या सोबत अनेक दिवसापासून प्रेम प्रकरण होते.परंतु या दोघांचे नेहमीच वाद होत होते त्यामुळे मयत भिमराव प्रकाश बोराडे हा त्रस्त झालेला होता शेवटी त्याने त्याची प्रेयसी संगीता ऊर्फ शर्मिला उस्मान तडवी हिच्या जाचाला कंटाळून पळसखेडा ता सोयगाव जि औरंगाबाद येथील‌ प्रेयसीच्याच राहत्या घरी दिनांक: ०७/०१/२०२३ रोजी सायंकाळी ८:३० गळ्याला फास लावून आत्महत्या केली.सदर युवकांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या त्याची प्रेयसी संगीता उर्फश र्मिला उस्मान तडवी हिच्या विरोधात मयताचे वडील प्रकाश शंकर बोराडे वय 79 वर्षे व्यवसाय शेती पळासखेडा तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद यांनी फर्दापुर पोलीस स्टेशनला तक्रार देऊन कारवाई ची मागणी केली होती त्याच्या तक्रारीवरुन आरोपी संगीता ऊर्फ शर्मिला तडवी हिच्या विरुद्ध आत्महत्येस कारणीभूत ठरली म्हणून फर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक ०९/०१/२०२३ रोजी गु र न . 03/2023 कलम 306 भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.सदर प्रकरणाचा तपास कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.बी वाघमोडे हे करत आहे

0 9 4 7 4 4
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *