मोबाईलच्या युगात ग्रीटिंग कार्ड झाली कालबाह्य…

KHOZ MASTER
2 Min Read

ग्रिटींग कार्ड ची मागणी घटली फेसबुक, व्हाट्सअप ,ट्विटर ,मेल , मेसेंज यांचा मोठ्या प्रमाणात वापर;प्रा.जीवन कोलते सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव शहरात सध्याचे युग हे विज्ञान युग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवाच्या जीवनशैलीवर परिणाम होताना दिसत आहे त्यामध्येच आता नवनवीन शोधांमुळे क्रांती झाली आहे मोबाईलचा शोध लागल्यामुळे कमी वेळात मोठ्या तब्बल कामे होताना दिसत आहेत. दहा वर्षापूर्वी नवीन वर्षाच्या शुभेच्छा, वाढदिवस शुभेच्छा, निमंत्रण ,प्रेम पत्र आदी देण्यासाठी ग्रीटिंग कार्ड चा उपयोग केला जात होता पण सध्या ते कमी झाला असून त्याची जागा मोबाईल मधील सोशल साधनांनी घेतली आहे प्रमाणात कामे होताना दिसत आहे यामुळे वेळ पैसा याची बचत उताना होताना दिसत आहे त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन नियोजन या सर्व गोष्टी त्वरित वेळात होता ना मोबाईल ची मदत होताना दिसत आहे.

पूर्वीच्या काळी संदेश देण्यासाठी पक्षाचा उपयोग केला जात असे पण हल्लीच्या काळात आता कालबाह्य झाले झाले असून आता मोबाईल मधील काही एप मुळे जग खूप जवळ आली असून मोठ्या पण शुभेच्छा देण्याची नव नवीन साधनांची निर्मिती झाली आहे त्यामुळे दिवसेंदिवस ग्रीटिंग कार्ड कालबाह्य होताना दिसत. अगोदरच नवीन वर्षाच्या शुभेच्छा ग्रीटिंग किंवा वाढदिवसाचे ग्रीटिंग कार्ड चे उपयोग मोठ्या प्रमाणात होत असते त्याचा मोठा मोठी दुकाने वेगळे ग्रीटिंग कार्ड असायची ते खरेदी करण्यासाठी युवक-युवती चा मोठा ओढा असायचा पण हल्लीच्या काळात त्याचा वापर करण्यास बंदच झाले असून त्यावर निर्भर असल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले आहे हे मात्र विशेष ग्रीटिंग कार्ड ची विक्री दुकानात होत नसल्यामुळे त्याची ग्रीटिंग कार्ड ठेवणेच बंद केल्याची माहिती साई जनरल स्टोअर्सचे मालक मुन्ना पाटील यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली मोबाईलच्या क्रांती झाली आणि ग्रिटिंग कार्ड ला कवडीमोलाचे स्थान बाजारपेठेत राहिले नाही . विशेष म्हणजे बदलत्या जगामुळे नवीन शोधामुळं वस्तू बाजारपेठेत येत आहे फक्त ग्रीटिंग कार्ड होते असे म्हणण्याची वेळ आता उरली आहे असे बोलले जात आहे .सध्याच्या युगात संदेश शुभेच्छा देण्यासाठी नवनवी साधने त्यामध्ये फेसबुक व्हाट्सअप ट्विटर मेला वर भर दिला जात आहे पण मोबाईलच्या युगात ग्रीटिंग कार्ड कालबाह्य झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही अशी प्रतिक्रिया प्रा.जिवन कोलते (सामाजिक कार्यकर्ते)सावळदबारा ता सोयगाव यांनी बोलताना दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *